बांबु लागवडीसाठी सर्व विभागांनी नियोजन करावे असे जिल्हाधिकारी यांचे आव्हान-जिल्हाधिकारी गोविंद बोडके…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- दिनांक 25 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत बांबु लागवडीसाठी सर्व विभागांनी मोठया प्रमाणावर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिले.

निसर्गाचे रक्षण व संवर्धनाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक विभागामार्फत बांबु लागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोंविद बोडके यांनी केले.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले की, “पर्यावरणाचा समतोल राखणे आणि निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हयातील विविध यंत्रणांची बैठक घेऊन याबाबत सुचना देण्यात आल्या असुन बांबू वृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. जे बांबू वृक्ष लागवड आपण करणार आहोत ते कुणीही तोडु नये. या वृक्षाचे जतन करुन त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.”

उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव यांनी सांगितले की, आपण भारत देशाचे सुजाण नागरीक असुन आपल्या सभोवतालचे वातावरण व परिसराची काळजी घेण्याची जबाबदारीही आपल्या सर्वाची आहे.

आज जागतिक स्तरावर पर्यावरणाचे बदल व वातारणात उष्णता वाढल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. विकास व प्रकल्पासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असुन वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. या वातावरणीय बदलामुळे खुप कमी वेळेत जास्त पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे पुर येऊन वन्यजीवन विस्कळीत होते. याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबु लागवडीच्या माध्यमातुन वृक्षारोपण व जंगल संवर्धन करुन हरीत करण्याबरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत एकुण ८,०९५ (हे.) बांबु लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ग्रामपंचायत विभाग २,०२९(हे.), सामाजिक वनीकरण विभाग – १,०२५, कृषी विभाग १,५५५ (हे.), वन विभाग २,४८६ (हे.), FDCM वनविकास महामंडळ – १,००० (हे.) असे उद्दिष्ट वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या पर्यावरण व शास्वत विकास टास्क फोर्स अंतर्गत मिशन मोडवर घेतलेल्या बांबू लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ ता.वाडा येथील वाडा (पू.) वनपरिक्षेत्रातील विविध परिमंडळ क्षेत्रात अभिसरण माध्यमातून जवळपास १४० हेक्टर वनजमिनीवर एकूण ४०,००० इतकी बांबु रोपांची लागवड करण्यात आली आहे, त्यामुळे तेथील मजुरांना रोजगार हमी योजनेमार्फत रोजगार उपलब्ध होऊन त्यांना प्रतिदिन र.रु.२९७/- इतकी मजुरी मिळत असून तसेच वनविभागामार्फत मजुरांना यासाठी भरीव मजुरी मिळणार असल्याने मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर सलग बांबु लागवडीसोबतच पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्या, लहान-मोठे नाले/ओढे, वनतळे, बंधारे, शासकीय जमिनी इ. ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेवर बांबू लागवडीचे नियोजन करण्यात आले असून TATA मोटर्स, कृषी विभाग व मग्रारोहयो विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातुन किमान ५,००० शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्येकी १०० बांबु रोपे लागवडीचे नियोजन पुर्ण झाले आहे.यामाध्यामातुन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीस देखिल मदत होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट