मा. जिल्हाधिकारी गोंदिया, श्री. प्रजित नायर साहेब , पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचेसमक्ष ७ लाखाचे जाहीर बक्षीस असलेला जहाल माओवादी यानी केले आत्मसमर्पण..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:- ▪️संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम वय 25 वर्षे राहणार-पुसनार, पो . स्टे., तालुका- गंगालूर, जिल्हा- बिजापूर (, छ. ग.) प्लाटून पार्टी कमिटी मेंबर असे आत्मसमर्पित माओवाद्याचे नाव आहे…
▶️ याबाबत थोडक्यात असे की, देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत “नक्षल आत्मसमर्पण योजना” राबविली जात आहे…
⏩ गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कैम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली माओवादि चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला , नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे…तसेच जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत….. त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे…
गोंदिया जिल्हा पोलीसांनी आत्मसमर्पण करीता केलेले आवाहन आणि माओवाद्यांचे संघटनेच्या अत्याचारास कंटाळून माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग असलेला- 07 लाखाचे बक्षिस असलेला जहाल माओवादी नामे- संजय उर्फ बिच्छेम पूनेम वय 25 वर्षे राहणार- पुसनार, पो.स्टे., तालुका – गंगालूर, जिल्हा- बिजापूर (, छ. ग.) प्लाटून पार्टी कमिटी मेंबर यांनी दिनांक 03/06/2024 रोजी माओवाद्यांच्या त्रासाला कंटाळुन मा. जिल्हाधिकारी गोंदिया, साहेब श्री. प्रजित नायर, गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे समक्ष आत्मसमर्पण केले आहे..
⏩ *आत्मसमर्पित माओवादी संजय उर्फ बीच्चेम याने ऑक्टोंबर 2013 मध्ये गंगालुर दलम मध्ये भरती होवून माड एरिया मध्ये कंपनी क्र. 7 व 10 मध्ये जहाल माओवादी – पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम सांभाळले, तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -1, व (सी.एन. एम.) चेतना नाटय मंच मध्ये काम केले आहे…. सदर माओवादी याने सन 2017-2018 मध्ये प्लॉटून-1 मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील पो. ठाणे- सालेकसा अंतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच पो. ठाणे- चिचगड अंतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल- पोलीस चकमकीत सक्रीय सहभाग घेवून चकमक घडवून आणली आहे…
आत्मसमर्पीत होण्याची महत्वाची कारणे :-*
➖➖➖➖➖➖➖➖👇
1) नक्षल संघटनेचे/चळवळीचे नेमके ध्येयधोरण खालील कॅडर ला कळत नाही… भविष्य अंधकारमय वाटतो.
2) माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे नक्षल चळवळी करीता पैसे/फंड गोळा करण्याबाबत सांगतात… परंतु प्रत्यक्षात सदर पैसा हे स्वतःसाठीच वापरतात.
3) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही…
4) माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवतींचा वापर करुन घेतात.
5) दलम मध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
6) परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतिही अडचण असली तरीही मदत करता येत नाही.
7) दलममध्ये असतांना वेळेवर जेवण वगैरे मिळत नाही. तेथील जिवन फार खडतर असते….आरोग्या विषयीं समस्या, उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.
8) पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे… पोलिसांची सारखी भीती वाटते.
9) वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात.
10) महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होवून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले जीवन सुकर करण्याचे आवाहन केले आहे…
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com