स्वच्छता हि सेवा पंधरवडा २०२४ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभांरभ….

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :-जिल्हा परिषद पालघर 17सप्टेंबर पासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे उपक्रम

दि. 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय येथे स्वच्छतेची शपथ घेवून स्वच्छता ही सेवा 2024 मोहिमेच जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) चंद्रशेखर जगताप, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक धनराज पांडे, तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.



स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरुन दरवर्षी प्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम दि. 17 सप्टेंबर 2024 ते दि. 2 ऑक्टोबर 2024 या पंधरवड्यात गाव स्तरावर ग्रामपंचायती अंतर्गत स्वच्छतेची जनजागरण करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित केली आहे.

17 सप्टेंबर पासून खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येणाऱ्या पंधरवड्याचे स्वरूप

  • 17 सप्टेंबर 2024 ला स्वच्छतेची शपथ घेवून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
  • 18 सप्टेंबरला सफाई मित्र सुरक्षा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असुन सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या लाभ देण्यासाठी राबविण्यात येणार आहे.
  • 19 सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरुपी स्वच्छता करणे, एक दिवस श्रमदानासाठी, सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक व बाजारपेठ, सार्वजनिक वाहतुक केंद्रे, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले, (NSS, NCC, SSG व ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी) यांच्या सहभागाद्वारे करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान 500 पुरुष व महिला सहभागी होणे आवश्यक आहे.
  • 20 सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणा-या कच-यांची लोकसहभागातुन स्वच्छता करणे.
  • 21 सप्टेंबरला जिल्हयातील संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे (संगीत, नृत्य प्रकार, संस्कृति दर्शन) स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे.
  • 22 सप्टेंबरला एकल प्लॅस्टिक (SUP) न वापरण्याबाबत जनजागृती करणे.
  • 23 सप्टेंबरला गृहभेटीद्वारे जनजागृती करुन, एक झाड आईच्या नावे उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  • 24 सप्टेंबरला तालुकास्तरावर सन्मानीय मा. खासदार व सन्मानीय मा. आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत “स्वच्छता ज्योत” आयोजित करण्यात येणार आहे.
  • 25 सप्टेंबरला टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करणे (शाळा व महाविद्यालयमध्ये स्पर्धा)

•26 सप्टेंबरला सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती.

  • 27 सप्टेंबरला Legacy Waste Sites साफसफाई करणे.
  • 28 सप्टेंबरला वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा / शोष खड्डा निर्मिती करणे.
  • 29 सप्टेंबरला स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उदघाटन करणे.
  • 30 सप्टेंबरला स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभिकरण करणे.
  • 1 ऑक्टोबरला स्वच्छता प्रतिज्ञा
  • 2 ऑक्टोबरला स्वच्छता दिवस साजरा करणे व स्वच्छ माझे आंगण उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

अशा प्रकारचे ग्रामपंचायतचे नियोजन असून प्रत्येक गावात प्रत्येक दिवशी स्वच्छतेची जनजागृती करीता सर्व उपक्रम राबवावे व लोकांना प्रत्येक उपक्रमात सहभागी करावे असे आवाहन प्रकल्प संचालक जिल्हा पाणी व स्वच्छता धनराज पांडे यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट