जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्तेजिल्हास्तरीय ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर:-
दि.13:- माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी संपूर्ण देशात 07 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने आज दि.13 डिसेंबर,2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पालघर जिल्हयाचा ध्वजदिन 2024 च्या निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.



या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी तेजस शिंदे, पोलीस उपअधीक्षक संगिता शिंदे, तहसिलदार सचिन भालेराव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव तसेच अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडून पालघर जिल्हयास गतवर्षी रुपये 25 लाख 48 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सदरचे उद्दिष्ट पालघर जिल्हयात 100 टक्के पूर्ण करण्यात आले. जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयांनी उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केल्याने यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावर्षी देण्यात आलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात यावा,असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. सैनिकांप्रती समाजाचे काही ऋण आहे. देशाचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करतांना उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्था विषयक समस्या, अतिवृष्टी, वादळ किंवा भूकंप सारख्या आपत्तीत दुदैवी नागरिकांच्या सहाय्यालना त्वरेने धावत जाऊन बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या आपल्या सैनिकांचे ऋण अल्पस्वरुपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनानिमित्ताने प्राप्त होत असते. तरी आपली बहुमोल सढळ हस्ते मदत करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,ठाणे यांच्या नावे धनादेश/धनाकर्ष किंवा QR कोडद्वारे करून ध्वजदिन निधीस सक्रीय हातभार लावावा व सैनिकांचे मनोबल वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी बोडके यांनी यावेळी केले.
ध्वजदिनानिमित्ताने 07 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर पर्यंत निधी गोळा केला. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटूंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसाह्य करण्यासाठी व युध्दात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरीता या निधीचा विनीयोग केला जातो. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांनी यावेळी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com