जिल्हा परिषद पालघर तर्फे अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप -अध्यक्ष श्री. प्रकाश निकम

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-आज दिनांक१२/३/२०२४ रोजी पोषण अभियान अंतर्गत सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका / मुख्य सेविका यांना सॅमसंग या कंपनीच्या सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल चे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, पंचायत समिती सभापती पालघर शैला कोळेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर प्रकल्प अंतर्गत सेविकांना मोबाईल देण्यात आले.पोषण ट्रॅकर ॲप मध्ये अंगणवाडी ची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या मुख्य उद्देशाने हे मोबाईल वाटप करण्यात आले.

एकूण 3453 मोबाईल जिल्ह्यात वाटप करण्यात येणार असून प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकेला देण्यात येणार आहे.
आपल्या पगारापेक्षा कितीतरी अधिक पटीने माझी अंगणवाडी ताई काम करत असून तिच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी यावेळी केले.तसेच तुम्हाला सांभाळून घेणारे,तुमच्या नेहमी पाठीशी उभे राहणारे भावसार सरांसारखे कुटुंबप्रमुख तुम्हाला लाभले आहेत,असे सांगून त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार यांचे कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी अंगणवाडी सेविका या दुर्गम भागात काम करत असून त्यांच्या साहाय्याने आपण कुपोषणाची संख्या कमी करण्यात यश मिळवले आहे,हा आकडा अजून कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार यांनी आणि आपली अंगणवाडी आदर्श अंगणवाडी कशी होईल यासाठी प्रयत्न करून मोबाईल जपून वापरा अशा सूचना यावेळी केल्या.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास प्रवीण भावसार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभारी गौरी धांगडा सर्व अंगणवाडी सेविका मुख्य सेविका उपस्थित होत्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट