उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभागामार्फत जनतेला काळजी घेण्याचे आवाहन..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-पालघर जिल्हयात मार्च पासूनच उन्हाचा तडाख जाणवू लागला आहे, एप्रिल, मे मध्ये उष्णतेत आणखी वाढ होऊन उष्माघाताचा धोका वाढू शकतो,त्याअनुषंगाने उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून नागरीकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब करायला हवा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघाताची लक्षणे
• त्वचा लाल होणे, वेदना होणे, सुज येणे, उष्णतेमुळे स्नायूमध्ये गोळे येणे.
•ताप, डोके दु:खी, खुप घाम येणे, थकवा येणे, चक्कर येणे, पोटात मुरडा येणे. इ.
• त्वचा थंडगार व कोरडी होणे, नाडीचे ठोके वाढणे/ मंदावणे
• कधीकधी अर्धवट शुध्द हरपणे

खालील व्यक्तींना उष्णेतेचा त्रास होण्याची दाट शक्यता असते

• उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे, काच कारखाण्यातील काम करणारे कामगार, वृध्द लोक व लहान मुले
• स्थूल देहयष्टी असणारे, घट्ट व अयोग्य कपडे घालणारे, पुरेशी झोप न होणारे
• गरोदर महिला, लहान बालके, उन्हात खेळणारी मुले
• अनियंत्रित मधूमेह, ह्रदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण व दारुचे व्यसन असलेले लोक
• काही विशिष्ट औषधे घेणारे लोक
• निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक
सार्वजनिक ठिकाणी उघ्माघात होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाय
• सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था – बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणे, बँका, पेट्रोल पंप, मुख्यरस्ते इ.ठिकाणी
• उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे.
• बागा, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर खुल्या ठेवणे
• टेरेसना उष्णता विरोधक रंग लावणे
• कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्या कामाच्या वेळा बदलणे
• उष्णतेपासून संरक्षण कसे करावे या बाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे
उष्णतेपासून वचाव करण्यासाठी काय करायला पाहिजे व काय करु नये
- हे करा
- पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा
- हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा
- उन्हात गॉगल, छत्री, पादत्राने वापरा
- उन्हात जातांना टोपी/ हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.
- पाळीव प्राण्यांना सावलीत/ थंड ठिकाणी ठेवा
- ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा
• हे करु नका
- शक्यतो उन्हाच्या वेळेत घरा बाहेर जाणे टाळा.
- उन्हात कष्टाची कामे करु नका
- पार्क केलेल्या वाहणात लहान मुलांना ठेवू नका
- गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका
- उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
*मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रींक्स घेऊ नका - खुप प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाऊ नका.
*जागरुक रहा. जिल्हयातील जनतेला उष्माघाताचा त्रास होऊ नये या करीता त्यांनी स्वत्:ची काळजी घ्यावी, आरोग्य यंत्रणे मार्फत उष्माघात प्रतिबंध कसा करावा, उपचार कोठे व कसे मिळतील या बाबत आरोग्य शिक्षण देण्यात येते, उष्माघात प्रथमोपचार, नियंत्रण, रुग्ण व्यवस्थापन या बाबीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व उपकेंद्र, प्रथमिक आरोग्य केंद्र स्तरावर औषधे व साधन सामुग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी सांगीतले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com