पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार तर्फे विद्यार्थांना शाळेपयोगी भेटवस्तू वाटप..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– गोंदिया जिल्हा पोलीस दल दादालोरा खिडकी योजने अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे., यांचे संकल्पनेतून आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा., गोंदिया कॅम्प देवरी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहिल झरकर, उपविभाग आमगांव, व ठाणेदार पोनि. भुषण बुराडे, पो.स्टे. सालेकसा, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोउपनि पडलवार, प्रभारी अधिकारी सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, व जिल्हा पोलीस, SRPF बल गटचे अमलदार यांच्या सहकार्याने आज दिनांक २३/०२/२०२३ रोज शुक्रवारला जिल्हा परीषद प्राथमिक शाळा बिजेपार येथे गोंदिया जिल्हा पोलीस विभाग सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार तर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उपक्रम दरम्यान जिल्हा परीषद प्राथमिक शाळा बिजेपार येथील कक्षा ०१ ते ०७ वर्गातील शाळेकरी मुला/मुलींना व आंगणवाडीतील मुला/मुलींना, मुलांचे सर्वागीण विकासाकरिता पाठयक्रम अभ्यासक्रमानुसार व नवनविन गोष्ठी चित्रकलेच्या माध्यमातुन चित्रण करता यावे व आवड निर्माण व्हावी या करिता पटसंख्यानुसार ०१ ली ते ०७ व्या वर्गातील एकुण ५६ मुला/मुलींना ड्राईंग बुक कलर किटसह तसेच आंगणवाडीतील बालगोपालांना २४ मुला/मुलींना प्रत्येकी ०१ पाणी बॉटल भेट वस्तु, वाटप करण्यात आले.



सदर चे कार्यक्रमाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजेपार येथील प्राचार्य जांभुळकर सर, कुभरे सर, पटले सर, परतेकी, अंबादे तसेच आंगणवाडी सेविका ईनवाते मॅडम हजर होते.

साहित्य वाटप स्त्युत्य उपक्रम या विशेष कार्यक्रम दरम्यान जिल्हा पोलीस चे अमलदार पोहवा. नाईक, पोशि. शहारे, दिवटे, सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार अमलदार सह व SRPF बल गट दाँड चे, पोउपनि आडागळे व पोलीस अमलदार मिळुन मा. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शपनपर सुचना व सर्व प्रकारच्या SOP चे पालन करुन सदरचे कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट