पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत” विदयार्थ्याना स्कूल बॅगचे वाटप, पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना स्पर्धा परिक्षा पुस्तकाचे वाटप, तसेच डिजीटल क्लास रूम सुविधेचे उदघाटन कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन, सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगावचे स्तुत्य उपक्रम…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :



🪷 गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र (AOP) मार्फतीने होणाऱ्या कामांना (उपक्रमास) माझे सहकार्य मिळेल– मा. जिल्हाधीकारी श्री. चिन्मय गोतमारे, यांचे संबोधन-

➡️ पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली नक्षल प्रभावित अतिसंवेदनशील आदिवासी भागातील जनतेच्या हिताकरीता " पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून "एक हाथ मदतीचा" योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
या अनुषंगाने सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव यांचे वतीने गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेच्या अंतर्गत जि. प. शाळा गंधारी येथील विदयार्थ्याना स्कूल बॅग चे वाटप तसेच पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना स्पर्धा परिक्षा पुस्तकाचे वाटप, तसेच नमुद विदयार्थ्यासाठी डिजीटल क्लास रूम सुविधेचे उदघाटन असा कार्यक्रम आज दिनांक 26-09-2023 रोजी आयोजित करण्यात आलेला होता.
सदर कार्यक्रमा करीता मा. जिल्हाधीकारी, श्री. चिन्मय गोतमारे, सा. हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे सा. गोंदिया हजर होते.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. जिल्हाधीकारी श्री. चिन्मय गोतमारे, सा. यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, मार्गदर्शन करताना सांगीतले की, पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून सुजाण नागरीक घडवण्याचे काम गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सशस्त्र दूरक्षेत्र (AOP) यांचे मार्फतीने सुरू आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कार्य आहे. आणि सदर कामाकरीता माझेकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे आपल्या भाषणात संबोधन केले.
त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले मा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे,सा.गोंदिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव यांचे वतीने घेण्यात येत असलेले उपक्रम निश्चीतच कौतुकास्पद असून त्यांनी अशाप्रकारचे उपक्रम नियमीत राबवावेत.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर श्री.शहारे सा . व तहसीलदार श्री. कांबळे सा.हे सुध्दा उपस्थीत होते. केशोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. सोमनाथ कदम, पो.उप.नि. प्रताप बाजड, पंचायत समिती सदस्या सौ. आम्रपाली डोंगरवार , ग्रामपंचायत गोठणगाव सरपंच श्री. संजय ईश्वार , ग्रामपंचायत बोंडगाव उपसरपंच श्री. दिलीप तिरपुडे , जि.प. शाळा गंधारी येथील शिक्षक श्री. कापगते व डाखोळे सर हे हजर होते .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे यांनी केले तर आभार पो.उप.नि. शुभम नवले यांनी मानलेत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सफौ. राजकुमार घोरमारे, पो. हवा. शामराव मडावी , सतिश भोवते, राजेश पुराम, गणेश मिसार, पो. ना.कमलेश राउत, किशोर नखाते, अरविंद वालदे,पो. शि.प्रकाश गभने, नोहर लाल लिल्हारे, रत्नशिल मेश्राम , नागेश देवकर यांनी परिश्रम घेतले.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com