मुंबई सुवर्णकार संघाचे पहिले सरचिटणीस व अध्यक्ष यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त फळे वाटप…

प्रतिनिधी- महेश वैद्य
मुंबई:


जवेरी बाजार विभागातर्फे सुवर्णकारांचे झूंजार नेते मुंबई सुवर्णकार संघाचे पहिले सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे पहिले अध्यक्ष स्व.सूर्यकांत वगळ यांच्या ५९ व्या पुण्यतिथी निमित्त मुंबई सुवर्णकार संघाच्या जव्हेरी बाजार विभागातर्फे शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
” सूर्यकांत वगळ प्रसूती गृह “
झावबावाडी, ठाकूरद्वार मुंबई नं. २. येथील रुग्णांस प्रमुख अतिथी, तरुण उद्योजक श्री.राजू कमळाकर काळे यांचे हस्ते फळे वाटप करण्यात आली.





फळे वाटपाच्या कार्यक्रमास श्री. राजू काळे धर्मपत्नी व मुलीसहित उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर, खजिनदार श्री.संजय पितळे, संयुक्त चिटणीस श्री.रवींद्र देवरुखकर, सह चिटणीस श्री.सतीश वैद्य, जव्हेरी बाजार विभागाचे अध्यक्ष श्री.अमरनाथ घोसाळकर, खजिनदार श्री.अमोल नारकर व बंधू श्री.नितेश नारकर, कामाठीपुरा विभागाचे सरचिटणीस श्री.विठ्ठल थाटोला ,श्री.संतोष सागवेकर, कुमारी सोनल जाधव इत्यादींची मोलाची उपस्थिती होती.


याप्रसंगी सूर्यकांत वगळ प्रसूतीगृहाचे गायनॉलॉजिस्ट (प्रसूती तज्ञ) डॉक्टर श्री.अभिजीत व त्यांचा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे मुंबई सुवर्णकार संघ व जव्हेरी बाजार विभागाच्या वतीने आभार मानण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com