स्वातंत्र्य दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान तर्फे जि.प.शाळा पांगळोली येथील विद्यार्थ्याना मोफत शालेय वस्तूंचे वाटप…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

म्हसळा:

राजे प्रतिष्ठान रायगडच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळा पांगळोली या म्हसला तालुक्यातील, जिल्हा रायगड येथील विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

राजे प्रतिष्ठान रायगडच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवार दिनांक 15 ऑगष्ट 2023 रोजी रा जि प. परिषद शाळा पांगळोली या म्हसला जिल्हा रायगड येथे ध्वजारोहण करून शाळेय विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शाळेय वस्तू वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला बहुसंख्येने शाळेय विद्यार्थी उपस्थित होते व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने म्हसला इथे पार पडला.

या कार्यक्रमाला अनेक विभागातील मान्यवरांनी, शालेय शिक्षक यांनी उपस्थिती लावली होती व अनेक मान्यवर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत व त्याना पुन्हा नव्याने पुन्हा एकदा शाळा चालू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर राजे प्रतिष्ठान रायगडने एक उत्कृष्ट अशी कामगिरी हाती घेऊन मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा घेऊन येण्यासाठी व त्यांना पुन्हा प्रोत्साहन व प्रेरणा व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा पांगळोली ग्रामस्थ व सरपंच पोलीस पाटील व अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती.

 तसेच या कार्यक्रमाचे आयोजन राजे प्रतिष्ठान रायगडचे संस्थापक अध्यक्ष श्री सोनल गोलाबंडे, श्री कार्याध्यक्ष श्री कैलास काप , सचिव सुरज परदेशी ,खजिनदार राजेश वाघरे ,सल्लागार मधुकर राणे, दिलीप पोस्टुरे ,गणेश वाघरे व कमिटी सभासद आणि राजे प्रतिष्ठान शिलेदार व शिवकन्या उपस्थित राहून केले .


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट