पोलीस बॉईज संघटना पालघर टीम तर्फे शेलिवली गावातील विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे वाटप…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-शिक्षण…. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध हे सांगणारे आपले सर्वांचे लाडके नेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गावागावात शिक्षण पोहचवणे, प्रत्येक व्यक्तीने शिकणे यासाठी प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या श्रीमती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र विचारांना वंदन करून व त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलोकन करून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन निराकरण समन्वय समिती सदस्य मा. श्री. राहुल अर्जुनराव दुबाले तसेच मुंबई / पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मनीष जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा महासचिव मंगेश उईके व संपूर्ण पालघर टीमच्या वतीने शेलिवली गाव पालघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे म्हणजेच वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.









कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवर पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री.अभिजीत धाराशिवकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण का करावे, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्याचप्रमाणे निर्व्यसनी राहण्याची फायदे पटवून दिले हे केवळ एक व्याख्यान नव्हते तर त्यांनी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांना आपल्या अनमोल शब्दांनी आकर्षित केले व त्यांच्या वयाप्रमाणे मार्गदर्शन केले.
तसेच व्यापारी वर्गातून तथागत फायनान्स सर्विसेस पालघरचे उद्योजक मा.श्री. आनंद राऊत साहेब यांनीही आपल्या जीवनातील काही चढ उतार, आपल्याला आलेले आयुष्यातल्ये अनुभव सांगून शिक्षण कसे घेतले आणि मी आज एका फायनान्स कंपनीचा मालक कसा झालो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवू शकता अशी विद्यार्थ्यांची हिम्मत वाढवली.तसेच राजकारणात सक्रिय असलेल्या शेलवली गावच्या महिला सरपंच श्रीमती सौ. सुवर्णा काकडे ताई ह्या एक महिला असून महिला किती प्रबळपणे काम करू शकते हे त्यांच्या भाषणात जाणवले.
वह्या वाटप हे केवळ नावासाठी नव्हते तर त्या वह्यांवर अभ्यास कसा करायचा अभ्यास का करायचा याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन होते. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महासचिव (cib ) पालघर जिल्हा अध्यक्ष.सुरक्षा पोलिस टाईम्स प्रतिनिधी. मंगेश उईके तसेच पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. शितल उईके
सल्लागार.संजय राऊत
पा.तालुकाध्यक्ष. संदेश मोरे
पा. ता.सचिव. किरण पाटील
पा. ता. संघटक. अमोल गायकवाड
दीपक मोरी
मनीष कांबळी
निलेश चव्हाण
माजी सरपंच.निलेश इभाड
भूमी सेना कार्यकर्ता संतोष भावर
तसेच पालघर शेलवाली गाव सदस्य व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी सदर
यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा तसेच डॉ.बाबासाहेबांचे जे स्वप्न होते गावागावात शिक्षण पोचवण्याचे या कार्यात या कार्यास हातभार लागला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com