संकल्प जनहित समितीच्या वतीने जि. प. मराठी शाळा निवळी कोदारे क्र. ३ येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

प्रतिनिधी-सचिन घाणेकर
चिपळूण :– तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा निवळी कोदारे क्र. ३ या शाळेत संकल्प जनहित समिती वतीने मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविक फोटो प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुलांनी सुद्धा आपल्या मनोगतातून त्यांचे विचार व्यक्त केले.


सकाळी प्रथम शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजता संकल्प जनहित समिती सामाजिक वतीने मुलांना शैक्षणिक वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभ्रा पाकळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती सुंदर प्रकारे सांगितली. उपस्थित मान्यवरांपैकी कळंबट हायस्कूलचे माजी शिक्षक श्री पांडे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचार मुलांनी आत्मसात करावेत. त्यांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण ग्रामीणचे अध्यक्ष पत्रकार संतोष कुळे यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बाल्यावस्थेतील कालखंड मुलांसाठी संस्कारमय असतो.

या वयात जे संस्कार मुलांवरती होतात ते कायम त्यांच्या मनात रुजतात. याविषयी त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर शाळेमध्ये वाचन कट्टा सुरू करावा, जेणेकरून मुलांचे वाचन कौशल्य सुधारून त्यांना वाचनाची गोडी लागेल. समोर येऊन बोलण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण होईल. यासाठी त्यांनी सुचित केले. संविधान प्रास्ताविका देताना त्यांनी त्या संदर्भातले काही माहिती सुद्धा उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाकळे आणि सहशिक्षिका मालती इरले यांना संकल्प जनहित समितीच्या वतीने भारतीय संविधानाची प्रास्ताविका फोटो फ्रेम देण्यात आली. आणि नंतर मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संकल्प जनहित समितीचे अध्यक्ष सचिन घाणेकर यांनी समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष सचिन घाणेकर, सचिव वैभव जुवळे, तंटामुक्त समिती निवळी अध्यक्ष मिलिंद डिके, संघ शाखा चिपळूण ग्रामीणचे खजिनदार भरत धूलप, नितेश खाडे, सदस्य ,सरपंच दिनेश पूनवत, समिती सदस्य सुरज जाधव, प्रवीण खांडेकर, मनोज घाणेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश गावडे आणि इतर ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ मालती इरले यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका शुभ्रा पाकळे यांनी मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com