जमीनेच्या घरगुती वादातून आई आणि मुलीच्या हत्या केल्याच्या प्रकरणी दीर आणि नंदेला मनोर पोलिसानी केली अटक..

उपसंपादक- मंगेश उईके
पालघर.:-मनोर तालुक्यातील सावरे गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक कलहातून वारंवार होणाऱ्या भांडणामुळे दीर आणि नणंद यांनीच आपली वहिनी आणि पुतणीची हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलातील ओहोळात फेकून दिले होते. याप्रकरणी संदीप डावरे आणि सुमन करबट या दोघांना घरगुती वादातून मायलेकीची हत्याचे आरोपी दिर आणि नणंदेला पोलिसांनी अटक केली.


सोमवारी सकाळच्या सुमारास पालघर तालुक्यातील सावरे गावाजवळ असलेल्या ओहोळामधील पाण्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पालघर तालुक्यातील सावरे है अतिशय दुर्गम गाव असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस या गावापासून सुमारे ११ किमी अंतरावर वसले आहे. सावरे गावातील बरडे पाडा येथील जंगलातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावचे पोलीस पाटील यांनी मनोर
पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी
स्थानिकांनी दिली. जिल्ह्याच्या दुर्गम भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ माजली असूनया
प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस
घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तो वाणीपाडा येथील सुश्मिता प्रवीण डावरे या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले, महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या करून मृतदेह ओहोळातील वाहत्या पाण्यातील दगडाला बांधून ठेवण्यात आला होता. तर महिलेची मुलगी मात्र गायब होती. मयत सुश्मिता डावरे आपल्या दोन वर्षांच्या मुलीसोबत गावाबाहेर असलेल्या शेतघरात राहत होती, तर तिचा पती एका मच्छीमार बोटीवर बाहेरगावी कामाला होता.
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या नेतृत्वाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके बनवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मयत महिलेचा दीर संशयित आरोपी संदीप डावरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कौटुंबिक वादातून सततच्या भांडणामुळे आपली वहिनी सुश्मिता डावरे आणि पुतणीची हत्या करून दोन्ही मृतदेह चार किमी अंतरावरील जंगलातील निर्जन भागातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यातील दगडाला बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. यामध्ये बहीण सुमन करबट हिने देखील मदत केल्याचे सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com