शेकडो ग्राहकांना कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा दिपंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २ मालकांना बोईसर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक : मंगेश उईके
बोईसर :- शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करून शेकडो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन जणांना पालघर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सूर्यकांत भिवाजी कांबळे, जयेश जगन्नाथ संखे अशी त्यांची नावे आहेत.


बोईसर येथे दिपंकर नागरी सहकारी पतसंस्था बोईसर यशवंत सृष्टी इथे असलेले कंम्पनी चे मालक सूर्यकांत कांबळे आणि जयेश संखे यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. कंपनीच्या माध्यमातून कांबळे आणि संखे यांनी ग्राहकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळवून देऊ, असे आमिष दाखवल होते. त्याला फसून शेकडो जणांनी कोट्यवधी रुपये गुंतवले होते. मात्र, दोघांनी फसवणुक केल्याचे लक्षात आल्यावर ग्राहकांनी तक्रार केल्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास पालघर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अनिल लाड, पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाड यांनी सूर्यकांत कांबळे आणि जयेश संखे यांना अटक केली होती.
दरम्यान, फसणुकर झालेल्यांची संख्या काही हजारांमध्ये असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत दोनशे तक्रारदार पुढे आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यादोघांविरोधात ठाणे येथेही फसवणुकीचा तसेच एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच बोईसर पोलीस ठाण्यात याआधीदेखिल एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दोघांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केली असून पुढील तपास चालु आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com