दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे परिसराकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

ज्याअर्थी दि ०३/०४/२०२५ रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे सौ तनिषा सुशांत भिसे या महिलेस प्रसुतीसाठी रुग्णालयमध्ये उपचाराकरिता आणले असता उपचारामध्ये दिरंगाई झाल्याने सदर महिलेचा दुदैवी मृत्यु झाला आहे. त्या अनुषंगाने दि ०५/०४/२०२५ रोजी पासुन विविध पक्षाचे कार्यकर्ते यांचेकडुन मोर्चे, आंदोलने, निदर्शने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात होत असल्याने रुग्णालय मधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत असुन आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवुन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्यायेण्याकरिता अडचण निर्माण होत आहे.

मोर्चा, आंदोलने, निदर्शने मध्ये बाहेरील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर आमंत्रित करुन जमावाने भाषणे, घोषणा देणे आदिंद्वारे सार्वजनिक शांततेचा भंग करुन रुग्णालयाचे वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यात व्यत्यय निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे याठिकाणी येणारे रुग्ण, रूग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या हिताच्या प सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णास पूरक, सौदार्हपूर्ण व शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल पुणे व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात निर्बंध घालणे जरुरीचे आहे. अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी मी रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये असा आदेश देतो की,

१. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, हा परिसर व त्याचे सभोवतालच्या १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

२. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश संबंधीत रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागु होणार नाहीत.

३. सदर रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.

४. सदर रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात येत आहे.

सदरचा आदेश दि. ०९/०४/२०२५ रोजी पासून ते दिनांक १९/०४/२०२५ रोजीपर्यंत अंमलात राहील. सदरच्या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील,

सदरचा आदेश भी, माझ्या सहीनिशी आज दिनांक ८/४/२०२५ रोजी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट