धारदार शस्त्राने वार करून जबरीने रोख रक्कम लुबाडणाऱ्या दोघांना गोंदिया पोलीसानी केले जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के
गोंदिया :
आरोपी नामे –
1) बादल रतनसिंग सोलंकी वय 21 वर्षे राहणार जळगाव (जामोद) जिल्हा– बुलढाणा
2) गोपाल मंगलसिंग राठोड वय 37 वर्षे राहणार मानेगाव तालुका-जळगाव (जामोद) जिल्हा- बुलढाणा
अशी जेरबंद करण्यात आलेल्या
आरोपीची नावे असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मौजा बरौंदा जिल्हा रायपूर येथून ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या…
⏩. याबाबत थोडक्यात प्रकरण अशाप्रकारे आहे की, फिर्यादी नामे- सुरज जगू यादव वय 30 वर्षे राहणार तुबडीबाड ता. डोंगरगाव, जिल्हा राजनांदगाव हा आपल्या गावी जाण्याकरीता एका बिना नंबर च्या पांढ-या रंगाच्या बोलेरो मॅक्स पिकअप गाडी ला लिफ्ट मागुन त्यांचेसोबत जातेवेळी फिर्यादी बसला असलेला बोलेरो मॅक्स पिक अप गाडीचा ड्रायव्हर व त्याचे सोबत असलेला ईसम यांनी घटना दिनांक – 14/02/2025 रोजी चे 01.15 वाजता ते 01.30 वाजता दरम्यान नॅशनल हायवे 53 वर मौजा – देवपायली नाल्याजवळ फिर्यादी च्या मानेवर एका धारदार शस्त्राने वार करून फिर्यादी च्या शर्ट च्या खिशातील रोख रक्कम 12,000/- रूपये जबरीने हिसकावुन फिर्यादी ला गाडी बाहेर ढकलुन दिले होते…असे फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे डुग्गीपार येथे अपराध क्रमांक 41/ 2025 कलम 309(6), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे..
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात सपोनि धीरज राजूरकर आणि पोलीस पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर प्रकरणाचा संपुर्ण घटनाक्रम जाणून घेतला.. प्राप्त गोपनीय माहिती... टोल नाक्यावरील CCTV footage यावरून गुन्ह्यात वापरलेले संशयित वाहन व आरोपींचा माग काढून आरोपी यांच्या मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आरोपी नामे -
1) बादल रतनसिंग सोलंकी वय 21 वर्षे राहणार जळगाव (जामोद) जिल्हा– बुलढाणा
2) गोपाल मंगलसिंग राठोड वय 37 वर्षे राहणार मानेगाव तालुका-जळगाव (जामोद) जिल्हा- बुलढाणा
यांना ग्राम- बरौंदा जिल्हा- रायपूर येथुन गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले... जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी यांना गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे...
आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिक अप मॅक्स वाहन जप्त करण्यात आले आहे.....आरोपींना पोलिस ठाणे डूग्गीपार पोलिसांचे स्वाधिन करण्यात आले असून गुन्ह्यात लुबाडलेली रोख रक्कम व वापरलेले हत्यार बाबत पुढील सखोल तपास डूग्गीपार पोलिस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी, श्री. विवेक पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक- सपोनि धीरज राजूरकर, पोहवा इंद्रजीत बिसेन, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, पोशी अजय रहांगडाले, राम खंदारे, यांनी कामगिरी केलेली असून पोलीस ठाणे डूग्गीपार चे पोलीस निरीक्षक श्री. मंगेश काळे, पोहवा अग्निहोत्री, रामटेके, चकोले, डहाके यांनी सहकार्य केले.