अपहृत झालेल्या २ अल्पवयीन मुलीचा १ तासाचे आत शोध घेवुन घेतले चंदनसर पोलीसानी घेतले ताब्यात..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
दि. १८/०३/२०२५ रोजी फिर्यादी नाने निर्भया यांची आई वय ३८ वर्षे, यांनी त्यांची मुलगी वय-१३ वर्षे, तसेच त्यांचे ओळखीची महिला निर्भया यांची आई वय-४० वर्षे, यांनी त्यांची मुलगी वय-१३ वर्षे यांना दिनांक १८/०३/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास शाळेत सोडल्यानंतर त्या शाळेत गेल्या नसलेबाबत त्यांचे शाळेतील हॉट्सअपवरती मेसेज आलेनंतर त्यांनी त्यांचे मुलींचा शोध घेवुन त्या मिळुन न आल्याने त्या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये आलेनंतर त्यांचा शोध घेणेकामी तात्काळ वेगवेगळ्या टिम तयार करुन, व तक्रार नोंद करुन घेत असताना त्यापैकी एका मुलीकडे मोबाईल असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने तिचे मोबाईलचे तात्काळ लोकेशन प्राप्त केले. लोकेशनचे आधारे त्या मुली कसबा पेठ पुणे या ठिकाणी असलेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांच्या टिम तात्काळ रवाना करुन रिक्षा चालकांचे मदतीने त्या दोन्ही मुलींना ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे आई वडील यांचे ताब्यात दिले.
यामध्ये पोलीसाची मदत करणारे रिक्षा चालक संतोष लक्ष्मण लोखडे व कृष्णा नागपुरे यांचा मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे सीमा ढाकणे यांनी त्यांचा सत्कार केला.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक किरण मोरे, पोलीस अंमलदार विजय टिकेकर, रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, अमोल कोळेकर, भारत उकिर्डे, शिवाजी धांडे, मनोज मंडारी, अतुल आदक, यांनी केली आहे.