धुळे येथील सराईत गुन्हेगार मोटारसायकल चोर अखेर स्था. गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळयात…

सह संपादक -रणजित मस्के
जळगाव

मा. पोलीस अधीक्षक डॉ.श्री, डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ कविता नेरकर मॅडम, यांनी जळगांव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आनणे बाबत वेळोवेळी कलविले होते त्याअनुशंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पथकास त्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या
दिनांक ०३/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहीती मिळाली की, भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत शेख इमरान शेख रफिक रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगांव हा व त्याचे सोवत एक इसम हे मोटारसायकली चोरी करीत आहेत. अशी माहीती मिळाल्यावरुन त्यांनी सदर गोपनीय माहीती बाबत कारवाई करण्यासाठी पथक नेमले त्यावरुन सदर पथकाने वरील आरोपी हा पाचोरा शहरात येणार असल्याचे गोपनीय माहीती काढली व त्या अनुशंगाने सापळा रचुन त्यास व त्याचे सोबत असलेल्या इसमांस पथकातील नमुद अंमलदारांनी जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेख इमरान शेख रफिक वय २४ ह.मु.ग्रीन पार्क कॉलनी भडगांव रा. अंबिकानगर शंभर फुटीरोड धुळे ता.जि. धुळे, २) शेख अकिल शेख शफिक वय २७ रा. जलाली मोहल्ला, भडगांव ता. भडगांव जि. जळगांव असे सांगुन त्यांची अजुन कसून चौकशी केली असता त्यांनी भडगांव शहरात विजय हॉटेलच्या समोरुन तसेच खोल गल्ली भडगांव येथे सलुनच्या दुकानासमोरुन अशा दोन ठिकाणांवरुन HF DILUX हिरो कंपनीची, बजाज कंपनीची प्लेंटीना अशा दोन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत भडगांव पोलीस स्टेशन वरुन सदर ठिकाणी मोटारसायकल चोरी बाबत गुन्हे दाखल आहे अगर कसे बाबत माहीती घेतली असता भडगांव पोस्टे गुरनं, २२६/२०२५ BNS ३०३ (२), गुरनं. २५०/२०२५ BNS ३०३(२) असे दोन गुन्हे दाखल असले बाबत माहीती मिळाली सदर आरोपीतांना अजुन विचारपुस करुन माहीती घेतली असता आरोपी क्र. १) शेख इमरान शेख रफिक वय २४ ह.मु.ग्रीन पार्क कॉलनी भडगांव रा. अंबिकानगर शंभर फुटीरोड धुळे ता.जि. धुळे याचे कडेस अजुन एक अॅक्टीव्हा सारखी काळ्या रंगाची मोपेड मोटारसायकल आहे. बाबत कळवीले तसेच सदर आरोपी याचेवर धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत बाबत माहीती मिळाली आहे. सदर आरोपीतांना पुढील योग्य त्या कारवाई साठी भडगांव पोलीस स्टेशन ला हजर केले आहे.
सदर पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर डोमाळे, पो.हे. कॉ, लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ. संदिप पाटील, पो.ना. राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील, पो.कॉ. भुषण पाटील अशांनी कारवाई केली आहे.