धोकादायक कमानींमुळे अपघाताचा धोका; श्रीराम उर्फ (बंटी) नांगरे पाटील यांनी नगरपंचायतीकडे निवेदन

सह संपादक -रणजित मस्के
सांगली

शिराळा (प्रतिनिधी) – शिराळा शहरात पारंपरिक नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि वाहनांची वर्दळ वाढते. मात्र, या रस्त्यांवर उभ्या असलेल्या काही आणि धोकादायक कमानी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरू शकतात, असा इशारा श्रीराम उर्फ (बंटी) नांगरे पाटील यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी नगरपंचायत शिराळा मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून या धोकादायक कमानी त्वरित हटविण्याची किंवा त्यांची योग्य दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. “या कमानी कधीही कोसळण्याची शक्यता असून त्यातून अपघात, जखमी होणे किंवा जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात,” असे निवेदनात म्हटले आहे.
श्रीराम (बंटी) नांगरे पाटील यांनी अजिंक्य कोळी प्रहार शिराळा यासंदर्भात तहसीलदार व पोलिस निरीक्षक शिराळा यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.