पालघर नगर परिषद मध्ये नगरसेवक श्री प्रवीण मोरे यांचे धरणे ठिय्या आंदोलन..

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर:-उपोषण करण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या प्रभागातील काम मुख्य म्हणजे नवलीनाका ते घोलवीरा रस्ता हा एकदमच खराब झालेला आहे म्हणजे रस्ता आहे की नाही हेही कळत नाही.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सगळे कामे बाकी आहेत माझ्या हद्दीमध्ये पालघर नगर परिषदेच्या नाकर्तेपणाच्या विरोधात लोकशाहीसाठी पालघर नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक 26/ 4/ 2023 रोजी सनदशीर मार्गाने आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले होते मुख्यअधिकारी पालघर नगरपरिषद यांनी स्वतः उपोषण स्थळी येऊन माझ्या मागण्याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन व हमी संदर्भ क्र. 8 नुसारच्या पत्रद्वारे दिली होती .

त्यांच्या सकारात्मक प्रतिसाद लोकहितास्तव प्रतिसाद देण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन संदर्भ क्र.9 प्रमाणे आश्वासन व हमीबाबत पूर्तता न झाल्यास मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशी कल्पना देऊन तात्पुरते काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले होते मुख्यधिकारी पालघर नगरपरिषद ह्यांनी लेखी आश्वासन व हमी देऊन 4 महिन्याचा कालावधी उलटूनही आमरण उपोषण आंदोलनात उपस्थित केलेल्या प्रभाग क्र.4 मधील नागरिकांच्या समस्या व प्रश्नाबाबत पालघर नगरपरिषददेकडून कोणतेही कारवाई झाल्याचे दिसून न आल्यामुळे दिनांक 15/09/2023 रोजी स्थगित केलेले आमरण उपोषण आंदोलन पुन्हा करण्यात आलेले होते. माझ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यास सुरुवात करावी अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुख्य अधिकारी पालघर नगरपरिषद यांनी दिलेल्या आश्वासन व श्री प्रवीण मोरे साहेब यांच्या मागण्यांबाबत दिनांक 7/01/ 2024 पर्यंत कार्यवाही ठोस निर्णय व प्रत्यक्ष कृती न झाल्यास दि.8/01/2024 पासून पालघर नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रभाग क्र.4 मधील नागरिकांच्या मागण्या व प्रश्न समस्या सुटेपर्यंत सनदशीर मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल व ह्यास सर्वस्वी आपण व आपले प्रशासन जबाबदार रहाल याची कृपया नोंद घ्यावी पालघर नगरपरिषद नगरसेवक प्रवीण मोरे साहेब यांनी सांगितले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट