धनगर समाजाची मते निर्णायक मांडेकरांना मतादीक्य द्या : विश्वास नाना देवकाते…

0
Spread the love

प्रतिनिधी-मारुती गोरे

पुणे ग्रामीण :-भुगाव ता. मुळशी येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात जमलेल्या,सकल भोर मतदार संघातील धनगर समाजाचा शंकर मांडेकर यांना पाठिंबा.

मुळशी भोर विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची वोट बैंक निर्णायक आहे. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी सर्व जाती धर्मांना सामावून घेऊन त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची काम केले आहे, म्हणून या मतदारसंघाच्या विकास पुत्राच्या पाठीशी आमचा धनगर समाज ठामपणे उभा राहणार आहे व मांडेकर यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व धनगर समाजाचे नेते विश्वास
नाना देवकाते यांनी व्यक्त केला. सकल धनगर समाज भोर, राजगड (वेल्हा), मुळशी तालुक्याच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी उपस्थित लोकप्रिय उमेदवार शंकर भाऊ मांडेकर यांचा सकल धनगर समाजाच्यावतीने घोंगडी, काठी व पुणेरी पगडी देऊन
सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार शरद ढमाले, राष्ट्रवादीचे प्रवक्तेः डॉ. शशिकांत तरंगे, युवकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अक्षय शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती बाबासाहेब कंधारे, भाजपाच्या
जिल्हा सरचिटणीस वैशाली सणस, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, धैर्यशील ढमाले, शंकर मारणे, राजेंद्र दबडे, राजेंद्र गुंड, अरुण राऊत, आनंद रोकडे इत्यादी मान्यवर तसेच भोर राजगड वः मुळशी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी देवकाते म्हणाले
आजही या मतदारसंघातील अनेक वाड्यावस्त्यांवर मूलभूत प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक शंकर मांडेकर हेच करू शकतात. खऱ्या अर्थांनी भोर मतदारसंघातील दानशूर व समाजातील प्रत्येकाच्या अडीअडचणीला अहोरात्र धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. यासाठी भोर मतदारसंघातील धनगर समाजाने व बांधवांनी महायुतीचे उमेदवार शंकर
मांडेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन सर्व समाजाला केले.

यावेळी माजी आमदार शरद ढमाले म्हणाले की, गेले पंधरा वर्षात या मतदारसंघात कोणतीही ठोस अशी विकास कामे झालेली नाहीत. तसेच महायुतीच्या काही इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे न राहता मांडेकर यांच्या पाठीशी उभे रहावे. विरोधक धनगर समाजात फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, मात्र शंकर मांडेकर यांनी सर्व समाजाला एकत्रित घेऊन राजकारण करीत असल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. मांडेकर यांच्या विरोधात चुकीचे करण्याचे कट कारस्थान रचण्यात आले. मात्र येथील लोक फेक बातमीला बळी पडणार नसल्याचा विश्वास डॉ. शशिकांत
तरंगे यांनी बोलताना व्यक्त केला.

यावेळी मांडेकर म्हणाले की, विरोधकांना या मतदारसंघाचा विकास नव्हे तर सत्तेची चावी हवी आहे. सत्ता उपभोगण्यासाठी त्यांना आमदार व्हायचे आहे, असे देखील यावेळी मान्यवरांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षात जो मतदार संघाचा विकास झाला नाही तो माझ्या पाठीशी उभे राहावे, मी महायुतीच्या माध्यमातून करून दाखवतो. विधानसभा

मतदारसंघात गाव, वाडी, वस्तीनिहाय दौरा सुरू करत असून विरोधी पक्षाचा अजेंडा हाणून पाडला जाईल असा शंकर मांडेकर यांनी व्यक्त केला विश्वास. यावेळी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री नामदेव हिरवे, सचिन मरगळे, मारुती मरगळे, मारुती गोरे, शंकर ढेबे, भाऊसाहेब मरगळे, लक्ष्मण बावधने आदी धनगर समाजातील अनेक तरुणवर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. मेळाव्याचे प्रास्ताविक शंकर मरगळे यांनी तर उपस्थितांचे आभार भाऊ मरगळे यांनी मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट