धाक दाखवुन जबरी चोरी करणा-या ०२ आरोपीतांना २४ तासाचे आत अटक

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :- दि. २८/०७/२०२३ रोजी मेघवाडी पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे श्री. अरूण कुमार बिंन्द, वय ३३ वर्षे, धंदा रिक्षाचालक हे गोरेगाव येथील भाडे सोडुन भांडुपकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी हात दाखवुन रिक्षा थांबवुन पवई येथे जायचे आहे असे सांगुन रिक्षात बसले. रिक्षा जे.व्हि. एल. आर. रोडने पवईच्या दिशेने जात असताना म.न.से. शाखा, रामवाडी जवळ आली असताना पाठी बसलेल्या एका इसमाने फिर्यादीचे गळ्यावर चाकु लावला व दुस-या इसमाने फिर्यादीचे शर्टाचे खिशातील मोबाईल व रोख रक्कम १९०० /- रूपये अशी १२,९००/- किंमतीची मालमत्ता जबरीने चोरी केली म्हणुन दिलेल्या तक्रारीवरून मेघवाडी पोलीस ठाणेस गु. र.क्र. २४८/२०२३. कलम ३९२, ३४ भादवि सह कलम ३७ (१) (अ) सह १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर नमुद गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.
दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना मेघवाडी पोलीस स्टेशन च्या अभिलेखावरील या प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांचे अभिलेख दाखवले असता फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील आरोपी नामे अभिषेक राजेश तुरे वय २७ वर्षे रुम नं.०३. जी २ ब्लॉक, नगोजी चाळ, प्रेमनगर, आयर्न मेडीकल शेजारी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई याचा फोटो पाहुन हाच आरोपी असल्याचे ओळखले आहे. त्यानंतर अभिषेक तुरे याचा शोध घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने परेश बाबुराव मांडवकर याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी नामे परेश बाबुराव मांडवकर वय २७ वर्षे रा. ठि. रूम नं.०३, शिवनाथ महिपत चाळ, मजासगाव टेकडी, गुंफा रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई याचा शोध घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर दोघा आरोपीतांना दाखल गुन्हयात ताब्यात घेवुन रितसर अटक केली.

सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सह आयुक्त (का व सु), मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री परमजित सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त श्री. दत्ता नलावडे, परिमंडळ १०. मुंबई व मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. अविनाश पालवे, मेघवाडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. व.पो.नि. श्री राजेद्र मांढरे, पो.नि. गुन्हे श्री प्रशांत भरते यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उप निरीक्षक मनोज भोसले व पो.ह.क. ०१.०३६/ ठाकुर, पो.शि.क. ०८.०३२८/ शेख, पो.शि.क. ११.११३७/पाटील, पो.शि.क. ११.०८२८/वरठा, पो.शि.क. ११.१९७७ / सुरवसे यांनी पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com