धडक कामगार युनियनचे श्री. अभिजीत राणे हे अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित..!

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई :
सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईतील धडक कामगार युनियन व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुंबई मित्र आणि वृत्त मित्राचे सन्मानीय श्री. अभिजीत राणे हे आपल्या राष्ट्र उभारणीसाठी जी सामान्य नागरिकांची सेवा करून
जी अति उल्लेखनीय कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांना सुरक्षा पोलीस टाइम्स या न्युज चॅनेल तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.









यावेळी त्यांना राजा शिव छत्रपतींची मूर्ती सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे आणि त्यांच्या सहकारी श्री. संजय शिंदे , नितीन खंडारे श्रीमती सीमा दोरुगडे, सानिका लाखन, सरिता वर्मा, रेखा पांचाळ , राजेश्रवरी पंडीत आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.