महाड मध्ये नैराश्यातून एका अल्पवयीन मुलाचा उंदीर मारायचा विषारी औषध घेऊन मृत्यू…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड:दिनांक 28 जुन 2023 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास श्री धोंडू लखु कोरपड यानी एमआयडीसी पोलीसाना दिलेल्या खबरिनुसार मुकाम दहिवड, देउळमाळ, ता.महाड जि.रायगड येथे मयत लक्ष्मण धोंडू कोरपड वय 14 वर्षे याने त्याची आई कपडे धुणयाकरिता 5 वर्षापुर्वी गेली असता पाण्यात बुडून मरण पावली, त्यानंतर 3 वर्षापुर्वी त्याचा मोठा भाऊ आंघोळीकरता गेला असता पाण्यात बुडून मरण पावला तसेच दुसरा भाऊ हा दिनांक 20 मे 2023 रोजी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेऊन मरण पावला अशा या नैराश्यातून मयत लक्ष्मण याने दिनांक 27 जुन 2023 रोजी सकाळी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेतले होते.

त्यानंतर त्याला औषध उपचाराकरिता महाड दस्तुरी नाका येथील न्यु लाईफ मल्टि स्पेशालिस्ट हाॅसपिटल येथे अडमिट केले असता त्याच्यावर औषध उपचार चालु असताना दिनांक 28 जुन 2023 रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. आंधळे यांनी घटनास्थळास भेट देवून त्यांचा मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड व सहायक फौजदार ढेपे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com