देशमुख कांबळे सरपंच यांनी आमची फसवणूक केली -रेश्मा नागेश देशमुख यांचे गंभीर आरोप..

0
Spread the love

.उपसंपादक : राकेश देशमुख

महाड महाड एमआयडीसीतील देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिर्ला या नावाने भली मोठी कंपनी नव्याने सुरू होत असून मागील एक वर्षापासून या कंपनीच्या नवीन ठेक्यावरून वाद सुरू आहेत. काही महिन्यापूर्वी प्रकल्पग्रस्त समिती यांनी एकत्रित येऊन हा वाद मिटवला होता मात्र आता या वादाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले आहे. येत्या 24 जानेवारी रोजी नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांच्या विरोधात उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.तसेच नागेश देशमुख यांच्या पत्नी रेश्मा नागेश देशमुख यांनीही सरपंच सुनील देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून येत्या 24 जानेवारी रोजी होणाऱ्या उपोषणामध्ये आपणही सामील होणार असून प्रशासनाकडून व प्रकल्पग्रस्त समिती कडून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी रेश्मा देशमुख यांनी केली आहे. उपोषणावेळी जर माझ्या पतीला दगा फटका झालाच तर याला फक्त आणि फक्त सरपंच सुनील देशमुख हेच जबाबदार असतील असे देखील रेश्मा देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट