देशाचे नावलौकिक करणाऱ्या श्रुती दिलीप उतेकर यांचे रानवडी ग्रामस्थांतर्फे जोरदार स्वागत

एका सामान्य कुंटुंबातील मुलीने मल्लखांब खेळामध्ये देशाचे मान सन्मान उंचावल्याबाबत संपुर्ण ग्रामस्थांमधे आज आनंदाचे वातावरण
पोलादपूर प्रतिनिधी-सखाराम साने
रानवडी (रायगड)दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 01: 00 वाजता पोलादपूर तालुक्यातील रानवडी गावातील सामान्य कुटुंबातील मुंबई (दहिसर) येथे रहावयास असणारी श्रुती दिलीप उतेकर हिने आवडीप्रमाणे इयत्ता तिसरी पासून मातोश्री स्पोर्ट्स अकादमी दहिसर मुंबई येथून मल्लखांब खेळायला सूरुवात केली.

त्यानंतर दहिसर फाउंडेशन स्पोर्ट्स अकादमी पासून तिने नॅशनल इंटर स्कुल वयक्तीक सिल्वर मेडल व टिमला गोल्ड मेडल मिळवून दिले.
दिनांक 27 ते 30 सप्टेंबर 2021 ऑल इंडिया फेडरेशन मध्ये वयक्तीक दोन सिल्वर मेडल रोप मल्लखांब टिमला गोल्ड मेडल मिळवून दिले . यापूढील असणारा छञपती अॅवार्ड मिळविण्याचा तिचा मानस असल्याचे तीने तयारी केली असुन या सर्व यशाचे श्रेय तीने आपल्या वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आपल्या आई -वडील व कोचेस शिक्षक यांना दिले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com