पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२. पुणे शहर यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ०३ गुन्हेगारास केले हदपार

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे :-
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, मालमतेचे नुकसान करणे, गैरकायद्याच्या मंडळीत सहभाग असण, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलीस स्टेशन कढील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२. पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन खालील नमुद ०३ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आदेश केलेले आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे (१) विकी ऊर्फ काश्या काशिनाथ कांबळे, वय २१ वर्षे, रा. आर. बी. १, ५५९. पाच बिल्डींग तक्षशिला बुध्द विहारामागे, सार्वजनिक शौचालय मागे १३ ताडीवाला रोड, पुणे (२) आतिष अशोक माने, दय २१ वर्षे, रा. चमन बेकरी मागे, शुरवीर मित्र मंडळाजवळ, श्याम गायकवाड यांचे घराजवळ १३ ताडीवाला रोड, पुणे, तसेच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे सुरज सुरेश आचार्य, वय २६ वर्षे, रा.५ बिल्डींग व्हीटीसी, स्वीपर चाळजवळ १३ ताडीवाला रोड, पुणे यांचा समावेश आहे.
सदर कारवाई मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, प.प्रा.वि., पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com