राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री दीपकभाऊ वानखडे यांच्यातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे कल्याण येथे मोठ्या उत्साहात स्वागत…

उपसंपादक-रणजित मस्के

कल्याण:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने कल्याण तालुक्यातील वरप गाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद, हिंदुराव साहेब ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे साहेब उपस्थित होते.
या मेळाव्याला जातांना ऐतिहासिक कल्याण शहरा मध्ये आगमन होतास दुर्गाडी किल्ला येथे अजित दादाचे स्वागत करण्यात आले व सामाजिक न्याय विभागाचे वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली प्रेम ऑटो मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यां सोबत घेऊन स्वागत करण्यात आले .


या स्वागत समारंभाला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ वानखडे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय वानखेडे, प्रदेश उपाध्यक्ष समीर भाऊ वानखेडे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवाळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य ममताताई वानखडे, सुनीताताई खैरनार, अनिताताई दाभाडे, प्रशांत तोरणे, सुशांत तोरणे, कैलास तोरणे, प्राध्यापक अजय काटकर सर, आनंद पगारे, प्रवीण गायकवाड, भास्कर चव्हाण, श्रीकांत कांबळे, सचिन तायडे, गौतम शिंदे, दिवेश वानखडे, मनाली वानखडे, अशोक गुप्ता इतर असंख्य कार्यकर्ते मिळून सत्कार करण्यात आला, व मोठ्या संख्येने सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com