उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष मा.राहुल दुबालेंच्या निवासस्थानी भेट

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

बीड:- बीड दि.३०(प्रतिनिधी):- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. राहुल दुबाले यांनी राज्यातील पोलीसांसाठी मोठा लढा उभा केला. प्रत्येक पोलीसांची मदत संघटनेच्या माध्यमातुन करण्यात येते. पोलीस पाल्यांच्या, पोलीसांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न घेवुन राहुल दुबाले यांनी ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन सोडविले आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबाले यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी दुबाले यांनी पोलीस पाल्यांचे आरक्षण व आरोग्याचा विषय त्यांच्यासमोर मांडला. सदरील प्रश्न लवकरच सोडवू असा शब्द ना. फडणवीस यांनी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे गटनेते प्रविण दरेकर, सहकार मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. दुबाले परीवाराच्या वतीने ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट