डेंग्यूमुळे एका महिला पोलीसाचा मृत्यु -10 दिवसाचे बाळ अनाथ…

प्रतिनिधी- रणजित मस्के
बारामती : पुण्यातील केईएम रुग्णालयात डेंग्यूने शीतल गलांडे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शीतल यांना प्रसूतीनंतर डेंग्यू आजाराची लागण झाली होती.बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शीतल यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ पोरकं झाले आहे.शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपाचारासाठी त्यांना केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे त्यांचे निधन झाले.शीतल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या.पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या.पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास पणदरे येथे करण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co