शिराळा तालुक्यातील प्रलंबितप्रश्नांचे निराकरण करण्याची तहसीलदारांकडे मागणी…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

शिराळा (सांगली ) :- शिराळा तालुक्यातील नागरी व महसूली प्रश्नांच्या सोडवणूकीबाबत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी तहसिलदार शामल खोत पाटील यांच्याकडे मागणी केली. रेशनिंग व निराधारांचे प्रश्न, तालुकास्तरीय संविधान भवनची उभारणी करणे. शिराळा शहरातील स्वच्छतागृहांची मागणी, शहरासाठीच्या कचरा डेपोचा प्रश्न भाटशिरगांव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातून निघालेल्या गौणखनिजाची लाखोंचा महसूल बुडवून परस्पर लावलेली विल्हेवाट, करमाळे येथील पिकाऊ जमिनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेला मुरूमाचा डेपो हटविणे व नुकसानभरपाई देणे आदी मागण्या करण्यात आल्या. शामल खोत- पाटील यांनी सदर प्रश्नांची नोंद घेऊन सोडवणूकीबाबत कारवाईचे आश्वासन दिले. वंचितचे सम्राट शिंदे, कॉंग्रेसचे विकास साळुंखे, आम आदमीचे राम पाटील, स्वाभिमानी शेतकरीचे राम पाटील, कामगार परिषदेचे मारूती रोकडे, बाळासाहेब पाटील, अमोल काटकर, अविनाश खोत, श्रीराम नांगरे, अजिंक्य कोळी, रोहित पाटील, शशिकांत पाटील, कैलास देसाई उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट