पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणा-या अट्टल सराईत ३ चोरट्यांकडुन तब्बल २० दुचाकी जप्त करण्यात कोंढवा पोलीसांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुबनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथकाचे पो. अं. संतोष बनसुडे व पो. अं. सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना तसेच पो. हवा. निलेश देसाई यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न केले. सदरचे संशयित आरोपी हे ध्रुव ग्लोबल स्कूलचे मागील बाजुस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने सदर माहितीच्या अनुषर्गाने पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सुजित मदन असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी दोन टिम तयार करून गेलो असता नमुद ठिकाणी रोडचे कडेला २ दुचाकी लागलेल्या व त्यांचेजवळ ३ इसम गप्पा मारीत असल्याचे दिसले. तेव्हा सदर इसमांना झडप मारून पकडुन नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) गौस मिरासाहब शेख वय २० वर्षे, धंदा बिगारी, मुळ रा. मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चाजनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे २) शाहरुख कासीम शेख वय २५ वर्षे, बंदा बिगारी, मुळ रा. मु.पो. गुंडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चायनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे व ३) जुबेर अहमद मंगरुळे वय २९ वर्षे, धंदा प्लंबर, मुळ रा. मु.पो. गुडपंत दापका, ता. मुखेड, जि.नांदेड सध्या रा. शिवनगरी पार्क, ममता स्वीटचे बाजुला, दिधी, भोसरी असे असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचेजवळ असलेल्या वाहनांबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन सखोल तपास केला असता वरील आरोपीतांकडुन २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पेंशन, २ एच एफ डिल्कस अशा चोरी केल्याचे सांगुन नमुद चोरी केलेल्या गाड्या या ग्राहक मिळेपर्यंत

वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवल्याचे सांगीतले. सदर आरोपी यांच्याकडुन एकुण २० चोरीच्या दुचाकी जप्त करून एकुण ७,३०,०००/- रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरील तीनही आरोपीकडुन

१. कोंढवा पोलीस स्टेशन कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस

हडपसर पोलीस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस

२. ३. भारतीविद्यापीठ पोलीस स्टेशन कडील एकूण २ गुन्हे उघडकीस

४. वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड, या पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस व आध्र प्रदेश भागातुन चोरी केलेली ए पी २८ बी जे ०५७२ ही दुचाकी देखील चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

वरिल प्रमाणे कामगिरी ही मा. अमितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. रंजनकुमार शर्मा सो सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५. मा.धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट