येरवडा मध्यवर्ती काागृहामध्ये ई-लॅबरीकैद्यांमधील व्यक्तीमत्व जडणघडणीसाठी निर्णय..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-मनुष्याच्या व्यक्तीमत्व जडणघडणीत वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्त्क वाचनामुळे नवीन गोष्टींची माहिती मिळते. विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर सकारात्म्क परिणाम होतो. वाचनातून यशस्वी व्यक्तींच्या जीवनकथा, त्यांचा संघर्ष, समस्या समजून घेण्याची व संघर्षातून व्यक्ती बाहेर पडुन सकारात्म्क जिवन जगु शकते, या बाब समजुन घेण्यास मदत होते. हीच बाब लक्षात घेत कारागृहातील कैद्यांना देखील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, साहित्यिक इत्यादी क्षेत्रातील प्रसिध्द् पुस्तके संगणकावर PDF स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध् व्हावीत, या दृष्टाने येरवडा मध्यवर्ती काागृहामध्ये ई-लॅबरी सुरू करण्यात आली आहे. सदर ई-लायब्ररीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश,एम.के.महाजन, सोनल पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, शैलेश बलकवडे (भा.पो.से) अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे यांचे उपस्थितीत झाले.

कारागृहातील बंद्यांसाठी “e-Library” हा उपक्रम अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपा पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा.डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृध्दिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यासाठी या ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर बंद्यांना वााचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

या सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनील एन. ढमाळ, उप अधीक्षक डॉ.भाईदास ढोले, पी.पी.कदम, आर.ई. गायकवाड, उप अधीक्षक, एम. एच.जगताप, उप अधीक्षक, आनंदा एस कांदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सी.आर.सांगळे, बांधकाम तुरुंगाधिकारी, शिवाजी पाटील, तुरुंगाधिकारी श्रेणी-2, अगंद गव्हाणे, शिक्षक, ए.बी.गुंगे, सुभेदार यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट