कर्जत मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त बौद्ध महासभा आणि आरोग्य धनसंपदा फाउंडेशन साई सिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

प्रतिनिधी-जमुना चव्हाण कर्जत ; रविवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी कर्जत येथे भारतीय बौद्ध महासभा नालंदा शाखा टिटवाळा पुर्व आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ पुर्व यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागातील असंख्य गरजु नागरीकानी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा भाग घेतला. यावेळी नालंदा शाखा टिटवाळा पुर्व येथील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








