मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर घातक केमिकलचा टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प!..

प्रतिनिधी- रेश्मा माने
महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळील दासगाव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाड एम आय डी सी मध्ये केमिकल घेऊन येणारा टँकर अचानक महामार्गावर पलटी झाल्याने महामार्ग मुंबई वरून गोव्याकडे व गोव्यावरून मुंबईकडे येणारी वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.


यामुळे या महामार्गावर तब्बल दोन्ही बाजूस चार किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील तासगाव गावाजवळ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास
लुपिन लिमिटेड तारापूर एम आय डी सी मधून महाड एम आय डी सी मधील जेट इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्या साठी स्पेनट ऑरगॅनिक सोलव्हेन्ट घेऊन येणारा टँकर क्रमांक एम एच ०४ बी जी ८१३ हा सकाळी १० वाजता दासगाव गावाजवळील एका वळणावर हा टँकर पलटी झाला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जवळील दासगाव गावाजवळ टँकर पलटी झाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड पो.उप नी. प्रवीण धडे, सहा.फौ.गणेश भिलारे,पो.हव.नंदन निजामपूर कर, पो.ना. अजय मोहित,पो.शि सनील पाटील,आणि महाड शहर पोलीस यांनी घटना स्थळी धाव घेत या घटनेचे गांभीर्य पाहता महामार्गावरील तात्काळ बंद केली व महाड अद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल तसेच सेफटी चे मार्क कॉर्डिनेटर चंद्रकांत देशमुख,सेफटी चे शीतल पाटील,रोहन पाटील, या पथकाला त्यांनी तासगाव जवळ टँकर पलटी झालेल्या ठिकाणी पाचारण केले.


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जवळील दासगाव गावाजवळ ज्या ठिकाणी टँकर पलटी झाला होता त्या ठिकाणी टँकर सुरक्षित ठिकाणी हलविण्यास तब्बल तीन तासाचा अवधी लागला त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तब्बल चार तास ठप्प होता याबाबत घातक रसायन वाहतूक करणाऱ्या टँकर मुळे किती मोठा भयानक प्रसंग उद्भवू शकतो हे आजच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे मात्र याबाबत कारवाई कोणी करायची व ती कशा स्वरूपाची करायची याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व राष्ट्रीय महामार्ग तसेच महामार्गावरील पोलीस कोणती दक्षता घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खरे तर घातक रसायनांची वाहतूक करणारे टँकर हे घातक रसाळ यांची वाहतूक करण्यास सक्षम आहेत का याची तपासणी प्रादेशिक परिवहन विभाग करीत नसल्याने हे असे प्रकार घडत असल्याचे या महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांकडून ऐकण्यास मिळाले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com