डीसीबी बँकेच्या एटीएम चोर गोविंदा निसाद ७२ तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई..

सह संपादक – रणजित मस्के
कोल्हापूर :दिनांक १९/०३/२०२५ रोजी मध्यरात्री ०२.४२ वा. चे सुमारास उचगांवपैकी निगडेवाडी येथील डीसीबी बँकेचे इमारतीचे बाहेरील बाजूस असलेल्या एटीएम मशिनचे रूम बाहेरील बाजुस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्प्रे मारून आतील एटीएम मशिनचा खालील बाजूचा पत्रा उचकटून चोरीचा प्रयत्न केला होता. सदरबाबत गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१०५/२०२५ भा. न्या. स. कलम ३०३(२), ६२, ३२४(४) प्रमाणे दिनांक १९/०३/२०२५ रोजी १५.१२ वा. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने उघडकीस आणणेकामी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.मा. वरिष्ठांकडून प्राप्त झाले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडील तपास पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेवुन गुन्हे उघडकिस आणण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गांधीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. १०५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२),६२,३२४(४) प्रमाणे दाखल गुन्हा गोविंदा निसाद रा. उचगांव. कोल्हापूर याने केला आहे. अशी माहिती मिळालेने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने आज दिनांक २१/०३/२०२५ रोजी उचगावपैकी निगडेवाडी, ता. करवीर येथे जावून गोविंदा राममिलन निसाद यांचे रहाते घराची माहीती घेवून त्यांचे घरी जावून त्यांना ताब्यात घेवून त्याचा नाव व पत्ता विचारला असताना त्याने आपले नाव गोविंदा राममिलन निसाद वय १९ वर्षे रा. राममिलन ग्राम-बडगो, बौरब्यास, पोस्ट बौरब्यास, बखिरा खास, संत कबीरनगर, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. उचगांवपैकी, निगडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे नितिन दत्तात्रय निगडे यांचे मालकीचे भाड्याचे खोलीत असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केलेचे कबुली देवून त्याचे कब्जातून गुन्हा करण्यासाठी वापरलेले ग्रायंडर मशिन, स्प्रे, गुन्ह्याचे वेळी अंगावर असलेली कपडे व इतर साहीत्य व मोबाईल असा एकुण १७,४००/-रूपयेचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा घडलेपासुन ७२ तासाचे आत एटीएम मशिन फोडून पैसे चोरी करण्याच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी गांधीनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो व मा. अपर पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, प्रविण पाटील, प्रदीप पाटील, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, अरविंद पाटील, शुभम संकपाळ, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती यांनी केली आहे.