दवनीवाडा हद्दीतील धोकादायक गुंड मनिष सेवईवार यांस “एमपीडीए” खाली एक वर्षाकरीता भंडारा.. काराग्रुहात स्थानबद्ध..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :–
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांचे आदेश,……गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. साहिल झरकर, श्री. रोहिणी बानकर, यांची कारवाई..
➡️ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मा. श्री. प्रजित नायर, यांनी दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध आदेश पारित करीत स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे…
⏩ जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश, आदेशान्वये महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एम. पी. डी. ए.) कायद्यांतर्गंत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन दवनीवाडा दवनीवाडा हद्दीतील सराईत धोकादायक गुन्हेगार गुंड ईसंम नामे- मनिष उर्फ जयराम धर्मराज सेवईवार, वय 45 वर्षे, रा.बलमाटोला/ रायपुर, तालुका जिल्हा- गोंदिया याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए.कायादयाअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे…
⏩ एम.पी.डी.ए. कायादयाअंतर्गत कारवाईचा गोंदिया जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे….
⏩ पोलीस ठाणे दवणीवाडा हद्दीतील धोकादायक गुंड – मनिष उर्फ जयराम धर्मराज सेवईवार, वय 45 वर्षे, रा. बलमाटोला/रायपुर, ता. जि. गोंदिया याला ‘एम.पी.डी.ए.’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी जिल्हा कारागृह भंडारा येथे आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी करण्यात आलेली आहे….
⏩ सदर गुन्हेगारांवर 16 गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये दुखापत करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, घरफोडी करणे, चाकू चा धाक दाखवून गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, अनुसुचित जाती जमाती च्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार करणे, अवैध शस्त्रे बाळगणे, अश्या विविध प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत…
⏩ स्थानबध्द इसमाकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, यांचे निर्देशांन्वये अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री. साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. रोहिणी बानकर, यांचे निर्देश मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सतीश जाधव, पो.ठाणे दवनीवाडा, यांनी व पोलीस निरीक्षक, श्री. दिनेश लबडे, स्थागुशा गोंदिया, पो.उप.नि. वनिता सायकर, पो.हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, स्थागुशा गोंदिया, यांनी व पो.ठाणे दवनीवाडा येथील पो.हवा. धनेश्वर पिपरेवार, उपविभाग गोंदिया पो.हवा रहुफ पठाण यांनी नमूद गुंड आरोपीविरुद्ध कारवाई करत एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव मंजुरी करिता पाठविण्यात आलेला होता…
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांनी नमूद धोकादायक गुंड इसमाविरूद्ध दिनांक- 03/04/2024 रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे…
⏩ काय आहे एमपीडीए कायदा ?👇
👉 महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एम पी.डी.ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी ) होय……सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती विरुद्ध एम.पी.डी.ए ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते….
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com