दत्तात्रेय देवस्थान चिंचवली गोरेगाव यात्रा उत्सवाचे आयोजन…

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-माणगाव तालुक्यातील कुणबी समाज बत्तीशी विभाग श्रीदत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिचवली गोरेगांवची जनरल सभा ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश केरु टेंबे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली सदरहू सभेमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्तमहाराजांची यात्रा (बुवाची यात्रा) उत्सव साजरा करण्याचे ठरविलेले आहे. सदरहू यात्रा उत्सव सोमवार दिनांक २१/०४/२०२५ रोजी साजरा करण्यांत येणार आहे. गेली अनेक वर्षे ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते. या यात्रेकरीता महाड तालुक्यातील दादली येथील लेझीम पथक व आकर्षक खालुबाजा ठेवण्यांत आलेला आहे. संध्याकाळी ६.०० वाजता श्री दत्तमहाराजांची पालखी व जतरकाठी घेऊन लेझीम पथक नाचवित सर्व समाज बांधव, मानकरी व मान्यवर श्री भैरवनाथ मंदीर गोरेगांव येथे जाऊन, भैरवनाथांची पालखी व जतरकाठी घेऊन पुन्हा दत्तमंदिरामध्ये येत असते. त्यावेळेस यात्रा उत्सवाला सुरुवात होत असते. यावेळेस हजारो भाविक दत्तमंदिरामध्ये येऊन दत्तमहाराजांचे दर्शन घेत असतात.
यात्रेचे नियोजन योग्य पध्दतीने होणेकरीता कमिट्या स्थापन केलेल्या असुन त्यामध्ये तक्रार निवारण कमिटीच्या अध्यक्षपदी. माजी अध्यक्ष शिवसेना संपर्कप्रमुख रायगड अरुण चाळके तसेच यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष म्हणुन युवा उदयोजक निलेश केसरकर तसेच दक्षता कमिटीचे अध्यक्ष म्हणुन तरुण नेतृत्व सुधाकर काशिराम करकरे तसेच प्रसिध्दी प्रमुख म्हणून रायगड जिल्हयामध्ये नावलौकीक असलेले पत्रकार राम सिताराम सिताराम भोस्तेकर यांची निवड करण्यांत आलेली आहे. या सर्व पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्यांत आलेली असून उपस्थितांनी टाळयांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
यावेळी यात्रेकरीता नामदार मंत्री भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन व खारभुमि विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य व अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी, यात्रेकरीता येणा-या दुकानदारांनी सर्व समाज बांधवांनी व सर्व समाजातील लोकांनी यात्रेकरीता उपस्थित राहुन श्री दत्तमहाराजांचे दर्शन घ्यावे व यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिंचवली गोरेगांव चे सेक्रेटरी पंढरी शेडगे व सर्व विश्वस्त मंडळ करीत आहे.
या जनरल सभेकरीता अध्यक्ष प्रकाश टेंबे, उपाध्यक्ष नथुराम करकरें, सेक्रेटरी पंढरी शेडगे, सहसेक्रेटरी संतोष भात्रे, खजिनदार मधुकर नाडकर, सल्लागार अरुण चालके, सल्लागार सिताराम उभारे, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, दगडू तोंडलेकर, वामन बैकर, रामचंद्र सत्वे, बाबु जुमारे, राजाराम टेंबे, अशोक शिंदे, सुधाकर करकरे,निलेश केसरकर,गजानन भोईर,राम भोस्तेकर सुजित भोजने, चंद्रकांत भोजने,परेश अंधेरे अरुण तोंडलेकर,राघो शिगवण, संतोष मालोरे ट्रस्टचे सर्व विश्वस्त व सभासद तसेच मोठ्या संख्येने उपश्थित राहून यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करणेबाबत ठरविण्यांत आले. या उत्सवात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समाजबांधवांन कडून करण्यात आले आहे.