दरोड्यातील कुविख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

औरंगाबाद: दिनांक ३० / ० ९ / २०२२ पोलीस ठाणे पाचोड हद्दीत दिनांक २२/०६/२०२२ रोजी दाभरुळ शिवारात रात्रीचे वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन गंभीर दरोडयाचे गुन्हे घडले होते , त्यानुसार पोस्टे पाचोड येथे गुरंन २१०/२०२२ कलम ३ ९ ५ भादवी व गुरंन २११/२०२२ कलम ३ ९ ५ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री . मनीष कलवानिया , औरंगाबाद ग्रामीण , यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमंलदार यांना गुन्हयात सहभागी असेलेले आरोपी निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते .

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखने यापूर्वी सदर गुन्हे उघडकिस आणुन आरोपी नामे शाहरूख आब्रश्या पवार रा . टाकळीअंबड ता . पैठण व रोहीदास ऊर्फ रोहया रामभाऊ बर्डे रा . चौडांळा ता . पैठण यांना अटक केली होती व इतर आरोपीतांना निष्पन्न केले होते , त्यानुसार निष्पन्न फरार आरोपी नामे नितीन ऊर्फ नित्या मिश्रीलाल चव्हाण रा . मालेगाव खुर्द ता . गेवराई जि . बिड याचे मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागिल दोन महिन्यापासुन होते परंतु तो सतत त्याचे राहण्याची ठिकाणे बदलत होता , तो सध्या प्रॉपर बीड शहरात आलेला असल्याची गोपनिय बातमी मिळाली तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तो सध्या मा . जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या आवारात असल्या बाबत खात्री पटल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २ ९ / ० ९ / २०२२ रोजी बीड शहरात गेले व तेथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखा बीडचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेऊन वरील आरोपीताचा जिल्हा व सञ न्यायालय परिसरात शोध घेत असता तो मा . न्यायालयाच्या गेटसमोर नगर रोडवर उभा असलेला दिसला त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ गेले असता सदर आरोपीसोबत असलेल्या त्याच्या महिला नातेवाईक यांनी स्थागुशाचे पथकासोबत हुज्जत घालुन , पोलीसांनी आरोपीस घेऊन जाऊ नये म्हणुन मज्जाव केला व सदर महिलांनी त्यांच्या अंगातील कपडे स्वतः फाडुन घेऊन , सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन आरडोओरड करुन अंगविक्षेप केला तसेच पोलीस पथकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला .

तरीही स्थागुशा औरंगाबाद ग्रामीणच्या पथकाने नितीन मिश्रीलाल चव्हाण , वय २५ वर्ष , रा . मालेगाव खुर्द ता . गेवराई जि.बीड यास ताब्यात घेतले आहे . सदर महिलांना स्थानिक महिला पोलीस अंमलदार व दंगाकाबु पथक बीडच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पो . ठाणे शिवाजी नगर बीड येथे आणले , पथकातील पोउपनि प्रदीप ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो . ठाणे शिवाजीनगर , बीड येथे शासकीय कामात अडथळा करणे , शासकीय नौकराने आपले कर्तव्य पार पाडू नये म्हणुन मज्जाव करणे बाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सदर गुन्हयातील आरोपी नामे नितीन मिश्रीलाल चव्हाण याचे विरुध्द दरोडा , जबरी चोरी अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत .

१) पाचोड २१० / २०२२ कलम ३९५ भादंवि

२)पाचोड २११/२०२२ कलम ३९५ भादंवि
३) पैठण २०४ /२०२२ कलम ३९४, ३४ भादंवि

सदर आरोपीस पो . ठाणे पाचोड येथे गुन्हयाचे पुढील तपासकामी जमा करण्यात आ औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील आणखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे सदर आरोपीकडुन उघड होण्याची शक्यता आहे .

सदरची कामगिरी मा.मनीष कलवानिया , पोलीस अधीक्षक , औरंगाबाद ग्रामीण , मा . पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक , औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे , पोलीस उप निरीक्षक प्रदीप ठुबे , पोना शेख नदीम , शेख अख्तर , वाल्मीक निकम , विजय धुमाळ , पो . अंमलदार रामेश्वर धापसे , राहुल गायकवाड यांनी केली आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट