दरोड्याच्या अतिगंभीर गुन्ह्यात पुरावा नसताना आरोपीत यांना कळवा पोलीसानी अटक करून गुन्हा केला उघडकीस

0
Spread the love

प्रतिनिधी-विश्रवनाथ शेनोय

कळवा :

फिर्यादी श्री. रियाज इब्राहीम पठाण, वय ५१ वर्षे, धंदा फळविक्रेता, रा. आर एन कॉम्प्लेक्स, विग बी, रूम नं. १०४, मिल्लत नगर १, भिवंडी नाशिक रोड, जि. ठाणे. यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दिनांक १२/०४/२०२५ रोजी १०:१० वा. ये सुमारास फिर्यादी हे भिवंडी येथुन वाशी येथे रिक्षाने जात असताना खारेगाव टोलनाक्याकडुन मुंब्राख्या दिशेने जाणाऱ्या रोडवर आर एम सी प्लॅन्ट, कळवा, ठाणे या ठिकाणी आले असताना ४ अज्ञात आरोपीत यांनी मोटारसायकल वरून फिर्यादी यांच्या रिक्षाचा पाठलाग करून रिक्षास खारेगाव टोलनाका कडून मुंब्रा कडे जाणारे निर्जन रस्त्यावर गातुन फिर्यादीस चाकू व रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन फिर्यादी यांच्याकडील रोख रक्कम रू. १३,०००,०० (तेरा लाख रूपये) दरोडा टाकुन चोरी करून पळून गेले महणून कळवा पो.स्टे. गुन्हा रजि.नं. १ ३१६/२०२५ भा.न्याय सं. कलम ३०९ (४), ३१० (२), १२६ (२), ३ (५) प्रमाणे दिनांक १२/०४/२०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व.पो.नि. अशोक उतेकर यांनी पो.निरी. वि‌ठ्ठल नावडे (प्रशासन), पो.निरी. अनिल गायकवाड (गुन्हे), सपोनिरी. ज्ञानेश्वर घोडे (तपासपथक प्रमुख) व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांना घटनास्थळी येणारे जाणारे नाशिक मुंबई महामार्गावर तसेच इतर परिसरात आरोपीत यांचा शोध घेणेकामी रवाना केलेले होते. नमुद परिसरातील १०० पेक्षा जारत सिसीटीव्ही फुटेज तपासुन व साक्षीदार यांच्याकडुन तसेब गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेवुन गुन्हयाचा तांत्रिकदृष्ट्या कौशल्यपुर्ण तपास करून यातील आरोपीत इसम फैजानअली अब्दुल सत्तार अंन्नाारी, वय ४१ वर्षे, धंदा लुम फॅक्टरी मध्ये नोकरी, राह. बाला कंपाउंड, इम्रान विंचु शेट बिल्डींग, भरमाल अपार्टमेंट समोर, फैज टेलरच्या वर, दुसरा माळा, भिवंडी, जि. ठाणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सांगितले की, फिर्यादी हे ऑटोरिक्षा क्रमांक एम एच ०४ के ए ९२६३ मधुन भिवंडी ते जे पी एम सी मार्केट वाशी असे जात असताना अटक आरोपीत व त्यांचे ४ साथीदार असे एकूण ५ आरोपीत यांनी आपआपसात संगनमत करून त्यापैकी ४ आरोपीत यांनी फिर्यादी यांच्या रिक्षाचा पाठलाग करून रिक्षाला खारेगाव टोलनाका कडुन मुंब्राकडे जाणारे निर्जन रस्त्यावर गाठुन फिर्यादीस चाकू व रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन फिर्यादी यांच्याकडील रोख रक्कम रू. १३,०००,०० (तेरा लाख रूपये) दरोडा टाकुन चोरी करून पळुन गेले असून गुन्‌ह्याची कबुली दिली आहे. यातील आरोपीत व त्याचे दोन साथीदार १) विवेक विलास वाघमोडे, वय २२ वर्षे, धंदा नोकरी राह. रा. भारतनगर सोसायटी, रूम नं. १०२, चिंचघर, कुडुस, ता. वाडा, जि. पालघर २) मयुर राजेंद्र पाटील वय २२ वर्षे, धंदा एतंबर, राह चिंचघर पाडा, कुडुस, ता.वाडा जि.पालघर असे एकुण तिन आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडुन गुन्ह्यात दरोडा करून मोरी केलेल्या रक्कमेपैकी एकुण रू. ५,२५,८५०/- रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटार सायकल १,६०,००० रू किमतीच्या असे एकुण ६,८५,८५० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करून गंभिर

स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. सदरची कामगिरी मा.श्री. सुभाष बुरसे सो. पोलीस उप आयुक्त परि. १ ठाणे, मा.श्री. उत्तम कोळेकर सो. सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे करण्यात आलेली आहे.

सदर उल्लेखनिय कामगिरीच्या अनुशंगाने श्री. अशोक उतेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा पोलीस स्टेशन, पो.निरी. श्री. विठठल नावडे (प्रशासन) पो.निरी. श्री. अनिल गायकवाड (गुन्हे) स.पो.नि.ज्ञानेश्वर धोंडे (तपासपथक प्रमुख) पो.हवा./३४१८ वैभव जोशी, पो.हवा./२६९३ प्रदिप शिंदे, पो.शि./२४०१ महादेव हजारे, पो. हवा./३६४५ जगदिश न्हावळदे, पो.शि./२०० स्वप्नील खपाले, पो.हवा./५४०८ उदय कोरे, पो.ना./४८८३ बुधे, पो.ना./७२६१ माळी यांना दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी बाबत काहीएक ठोस माहिती उपलब्ध नसताना गुन्हा उघडकीस आणला असुन पुढील तपास सपोनि. ज्ञानेश्वर घोडे, कळवा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट