पालघर जिल्ह्यात पेट्रोल पंप लुटण्याआधीच दरोडेखोर गजाआड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :– बोईसर जागरूक ग्रामस्थांनी दिलेल्या पूर्वमाहितीच्या आधारे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या मुसक्या मनोर पोलिसांनी आवळल्या आहेत. मनोर- पालघर रस्त्यावरील गोवाडे गावात बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मनोर पोलिसांनी कारवाई करत चार दरोडेखोरांना अटक केली, तर दोन जण पळून गेले. चारही आरोपी राजस्थानमधील असून वीरेंद्र नरेंद्र सिंग (२१), रमेशकुमार कुंदनलाल शर्मा (२८), आकाश ओमप्रकाश दढिया (८), अनिल बिरजुराम कुमावत (२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गोवाडे गावातील एका जागरूक ग्रामस्थाने बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मनोर-पालघर

रस्त्यावरील गावातील रोहित जीवन संखे यांच्या घरालगतच्या पेट्रोल पंपाशेजारच्या शेतामध्ये काही संशयित व्यक्ती दबा धरून बसल्याची माहिती मनोर पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड पोलीस पथकासह गोवाडे गावात पोहोचले होते. पोलिसांचा ताफा

पाहताच दबा धरून बसलेले संशयित सहा व्यक्ती पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून काही अंतरावर चार आरोपींना पकडण्यात यश आले. मात्र, दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून बंदुक, चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरसारखी घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट