दरोडा टाकणार्या ५ आरोपींना पिस्टल व धारधार हत्यासह कराड शहर पोलीस व स्था. गुन्हे शाखा यांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक- रणजित मस्के
कराड :– कराड हे सातारा जिल्हयातील एक मोठी बाजारपेठ असून शहराची राजकिय व गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे शहरातील गुन्हेगारीवर नेहमीच बारकाईने लक्ष असते. त्याअनुशंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस
निरीक्षक महेंद्र जगताप यांनी त्यांचे कार्यपध्दतीने कराड शहरातील गुन्हेगारांवर चांगलीच वचक निर्माण केली आहे. दि.२०/०५/२०२४ रोजी दुपारी १४.३० वा.चे. दरम्यान धरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथक शहरामध्ये गस्त घालत असताना विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याचे तयारीत असून तात्काळ त्याठिकाणी जावून कारवाई करणे बाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेस आदेशीत केले नुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे अनिल स्वामी, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, महेश शिंदे हे तात्काळ नमुद ठिकाणी दाखल होवून पिस्टल, सुरा, कोयता, यासारख्या हत्यारांनी सज्ज असलेल्या आरोपींना ताब्यात घेत असताना चित्तथरारक असा पाठलाग करुन जिवाची पर्वा न करता ताब्यात घेतले व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) बबलु उर्फ विजय संजय जापेर वर्षे रा.शहापुर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर (खून, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.)
२) निकेत वसंत पाटणकर रा. गोडोली ता.जि. सातारा (खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे एकूण ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.),
३) सुरज नानासो बुधाचले रा. विसापूर ता. खटाव जि.सातारा (खुन आर्मअॅक्ट) असे गंभीर गुन्हे दाखल आहेत,
४) राहुल अरुण मेनन रा. केरळ सध्या रा. विद्यानगर कराड,
५) आकाश आनंदा मंडले रा. खटाव जि. सातारा असे असून त्यांचे ताब्यातून ३ देशी बनावटीची पिस्टान, ४ जिवंत काडतुसे, १ धारधार सुरा, २ कोयते व इतर दरोडयाचे साहित्य असा एकून ३,३७,०००/- रुपयेचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी वरील प्रमाणे खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, आर्म अॅक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून नमुद आरोपीच्या मुसक्या आवळून कराड शहर पोलीसांनी पुन्हा एकदा कार्यक्षमता सिध्द केली आहे.


सदरची कामगिरी ही श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराह विभाग, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील कराड शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रोहित फाणें, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार विवेक गोवारकर, संजय देवकुळे, शशिकांत काळे, अमित पवार, प्रविण काटवटे, सचिन सुर्यवंशी, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, धीरज कोरडे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, संदिप शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, लैलेश फडतरे, साबीर मुल्ला, अविनाश चव्हाण, रोहित निकम, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com