दरोडा व वाहन चोरीचे एकुण १० गुन्हे पुणे पोलीसानी केले उघड…

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

दि.२८/०२/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार अमित गद्रे व बाळु गायकवाड यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी इसन नामे १) डाड्या ऊर्फ रियाज शार्दुल्ला शेख, वय २१ वर्षे, रा. आमराई कोकाटे चाळ जवळ, पाषाण, पुणे २) अनिल लिंगया भंडारी, वय ३४ वर्षे, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे कब्जात मिळुन आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे संशय आल्याने त्यांना राब्यात घेवुन, त्यांचेकडे अधिक तपास केला असता, त्यांनी पुणे शहर व इतर कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केलेली होती. नमुद आरोपी यांचेकडुन किंमत ५,६०,०००/-रु.च्या एकुण १० दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करुन, खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

१) मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)

२) मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १५/२०२५ बी. एन. एस. सन कलम ३०३(२)

३) सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४१/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)

४) सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५९/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)

५) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २२६/२०२५ बी. एन. एस कलम ३०३(२)

६) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा जि. नं. २१४२/२०२४ बी. एन. एस कलम ३०३ (२)

७) कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५८/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)

८) बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २०/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)

९) राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. २६/२०२५ बी. एन. एस कलम ३०३(२)

१०) शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, गुन्हा रजि. नं. २६/२०२५ बी.एन.एस कलम ३०३(२)

वरीलप्रमाणे वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एकुण १० दुचाकी वाहने असा एकुण ५,६०,०००/- रु.चा मुद्देमाल अटक आरोपीकडून जप्त करुन, १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे पोलीस अंमलदार, अमित गद्रे, बाळु गायकवाड, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, दत्तात्रय पवार, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, नारायण बनकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट