“धोकादायक व्यक्ती” दिनेश उर्फ डाल्या याला एमपीडीए कायद्यान्वये केली मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे रवानगी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

भंडारा :-दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम वय 49 वर्ष रा. आंबेडकर वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन तुमसर परीसरातील आंबेडकर वार्ड तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम हा सन 2021 पासून निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस ठाणे तुमसर, भंडारा येथे खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचारी हमला, दंगा, मोक्का कायदा अशा प्रकारचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये धोकादायक व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था थोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.

अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम वय 49 वर्ष रा. आंबेडकर वार्ड तुमसर ता. तुमसर जि. भंडारा (महाराष्ट्र) याचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास दिनांक 5/04/2024 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा धोकादायक व्यक्ती, रेती तस्कर, हातभट्टीवाले यांचे गुन्हे अभिलेख तपासुन एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीमती रश्मिता राव एन उपविभाग तुमसर, यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.), तत्कालीन ठाणेदार श्री. निलेश ब्राम्हणे, व नरेंद्र हिवरे पोलीस निरीक्षक, पो.स्टे. तुमसर, पो.हवा. राजेश पंचबवे, पो.ना. अंकोश पुराम, सफौ. धर्मेद्र बोरकर, पो.ना.मार्कड डोरले यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट