दामिनी पथकानी नक्सलग्रस्त कावराबांध, व बोरगांव बाजार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जनजागृतीपर केले मार्गदर्शन

0
WhatsApp Image 2025-01-14 at 8.10.55 PM (1)
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया

पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश, मार्गदर्शनाखाली महिला, मुली, शाळकरी बालके, विशेषतः मुली, युवती यांचे सुरक्षितता संबंधाने रात्र-दिवस गस्त पेट्रोलिंग जनजागृतीपर आयोजित कार्यक्रमाव्दारे, गोंदिया जिल्हा स्तरावर स्थापन दामिनी पथक जनजागृतीचे कार्य करीत आहे…त्याचप्रमाणे कायद्याचे ज्ञान नसलेल्या, अडाणीपणामुळे लहान मुले-मुली यांचे बालविवाह करणाऱ्याचे मनपरिवर्तन, समुपदेशन करून बालविवाह रोखण्याचे उल्लेखनीय कार्यसुध्दा दामिनी पथकाद्वारे केले जात आहे..



दामिनी पथकाने दिनांक 9 जानेवारी रोजी नक्सलग्रस्त भागातील सालेकसा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कावराबांध येथे व दिनांक – 10 जानेवारी 2025 रोजी देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, बोरगांव बाजार येथील विद्यार्थाना

1) सायबर क्राईम, (ऑनलाईन फसवणूक)

2) लैंगिक अत्याचारापासुन बालकाचे संरक्षण अधिनियम 2012,

3) मोटार वाहन अधिनियम,

4) रस्ता सुरक्षा,

5) बालविवाह,

6) बालविवाह मुक्त भारत

7) विद्यार्थांना लैंगिक छळवणूक

ईत्यादी बाबद शालेय विद्यार्थाना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले….. तसेच कठीण प्रसंगी आत्मसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) चे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले…

सदरचे मार्गदर्शन दामिनी पथकाचे म.पोउपनि. पुजा सुरळकर, पोशि राजेंद्र अंबादे, रमेंद्रकुंमार बावनकर, मपोशि वैशाली भांदक्कर, पुनम मंजुटे, नापोशि. राधेश्याम रहांगडाले , इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी चे दीपमाला भालेराव , अँड. दीपक केसरकर आणि अँड विमल भाजीपाले यांनी केले. तसेच कावराबांध येथील विद्यालयाचे प्राचार्य श्री. दराडे सर, आणि शिक्षक वृंद तसेच बोरगाव विद्यालयाचे प्राचार्य सर व इतर शिक्षक गण यांचे उत्तम असे सहकार्य लाभले…



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट