पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर :– दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात दालन क्रमांक आठ खर्च नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय तळमजला मुख्य प्रशासकीय इमारत नवीन कोळगाव पालघर ता. जि.पालघर येथे खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 8 मे रोजी तर दुसरी 13 मे रोजी तर तिसरी तपासणी 17 मे २०२४ रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी .गोविंद बोडके . यांनी दिली आहे.
याप्रमाणे तपासणीचे वेळापत्रक खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले असून वरिल नमुद दिनांकास तपासणी करिता उमेदवारांनी उपस्थित रहावे.असे कळविण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे परिशिष्ठ E-१ भाग अब क.,खर्चाची मुळ प्रमाणके (nvoice, GST क्र. ईत्यादि सह परिपुर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अदयावत बैंक पासबुक / Statement सर्व परवाने (वाहन, रॅली, ई) इ. कागदपत्रांसह
वरील नमुद वेळापत्रकाप्रमाणे उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेखे निवडणूक खर्च निरीक्षक यांना उपलब्ध करुन न दिल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ प्रमाणे उमेदवारानी प्रतिदिन अभिलेख अदयावत ठेवले नसल्याचे समजण्यात येऊन योग्य कारवाई करण्यात येईल.
असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी कळविले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट