डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील पारनाका सागरी पोलीस पोलीस चौकीचे उद्घाटन…!

उपसंपादक : मंगेश उईके
डहाणू.
दि.२३/०१/२०२५ रोजी डहाणु पोलीस ठाणे हद्दीतील पारनाका सागरी पोलीस चौकीचे संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने सागर रक्षक व ग्रामरक्षक यांना मार्गदर्शन केले.




यावेळी विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, अनिल लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार, सागर रक्षक व ग्रामरक्षक तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.