दागिने घेण्याच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या महीलेला हडपसर पोलीसांनी केले जेरबंद..

0
Spread the love

पुणे: दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी हडपसर येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या शहरातील नामांकित ज्वेलर्स मध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने घेण्याचा बहाण्याने चोरी करणाऱ्या एका सराईत महिला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले.

दागिने घेण्याच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या महीलेला हडपसर पोलीसांनी केले जेरबंद..

या महिलेने पुणे शहरात केलेल्या बारा चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तिच्याकडून 6 लाख 25 हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहेत.

पुनम परमेश्वर देवकर (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या महिलेची नाव आहे. हडपसर येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या सराफा दुकानातून 23 नोव्हेंबर रोजी एका महिलेने लक्ष विचलित करून सोन्याची अंगठी चोरून नेली होती.


या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहरातील पुना गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार, ब्लू स्टोन अशा नामांकित सराफा दुकानांमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे घडले होते. त्या सर्व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला त्यामध्ये दिसून आली.

हडपसर पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. यामध्ये दिसणारी महिला हडपसर वरून दिल्ली वाडीपर्यंत गेल्याचे सीसीटीव्हीचा तपासणीत दिसून आले. दरम्यान गुरुवारी हडपसर पोलिसांचा तपास पथकातील पोलिस कर्मचारी सराफा दुकान परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित महिला दिसून आली. त्यांनी या महिलेला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता ती गडबडून गेली.

त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्या कडून 12 चोरीच्या घटना उघडकीस आणले असून 6 लाख 23 हजार रुपये किमतीच्या 12 सोण्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट