दादर येथे दाभोळ बुरोंडी जनजागृती मंच तर्फे जमिनी विषयी विशेष मार्गदर्शन शिबीर संपन्न

प्रतिनिधी-अनंत फिलसे
दादर :
रविवार दिनांक 2 मार्च रोजी दादर येथे दाभोळ बुरोंडी जनजागृती मंच तर्फे जमिनी विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. विभागातील श्री सूरज संजय गोरीवले, श्री तेजस भिकाजी पवार श्री तुषार गंगाराम माने श्री अमोल मोहन जाधव या तरुण मंडळींनी एकत्र येऊन आपल्या विभागासाठी या शिबिराचे आयोजन केले होते.
सदर मार्गदर्शन शिबिरास मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील डॉ ॲड रंजना खोचरे मॅडम तसेच महसूल अभ्यासक श्री सुनील भडेकर सर यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले.

जागेचा ७/१२ वाचन, महत्वाची कागदपत्रे,जमीन महसूल विषयक कायदे व जमीन महसूल कामकाज, भूमी अधिग्रहण व संपादन जमीन मोबदला, वारस तपास हक्क सोड पत्रक तसेच संपूर्ण कोकणाला भेडसावणारा बेदखल कुळ या विषयांवर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री अमोल जाधव तसेच आभार प्रदर्शन श्री तेजस पवार यांनी केले.
सदर मार्गदर्शन शिबिरासाठी दाभोळ बुरोंडी विभागातून तसेच मुंबई मधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.