सायकल चोरटे बोरगाव पोलीसांचे ताब्यात

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-

दि. ०१/०९/२०२३ रोजी सायकाळी ०५.३० वा. ते रात्री ०९.३० वा. चे दरम्यान मौजे खोजेवाडी ता.जि. सातारा गावचे हदीतुन राजेंद्र जगन्नाथ घोरपडे यांच्या राहते घराचे पार्कंगमधुन १२,०००/- रु. किंमतीची हिरो कंपनीची स्प्रीन्ट नावची काळ्या रंगाची गेअरची सायकल अज्ञात आरोपी चोरट्यांनी मुद्दाम लबाडीने चोरून नेहले बाबत राजेंद्र जगन्नाथ घोरपडे रा. खोजेवाडी ता. जि. सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाणेस गु. रजि. नं.४१२/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रार दाखल झालेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व त्यांचे डी.बी. पथक गुन्हा घडले पासुन गुन्हा उघड करण्याच्या अनुशंगाने गोपनिय बातमीदारांना सतर्क करुन गुन्हेगारांच्या मागावर होते. त्यावेळी आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे अपशिंग (मि.) येथे असलेची गोपनीय माहिती मिळालेने पोलीस पथकाने सापळा लावुन अपशिंग (मि.) ता.जि. सातारा येथुन विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतलेनंतर त्यांने गुन्हा केलेचे कबुली देवुन इतर दोन आरोपींचे मदतीने सायकली चोरुन विकल्याची माहिती दिली. इतर दोन आरोपींचे नावे निष्पन्न करुन आरोपींना ताब्यात घेवुन चोरीमध्ये वापरलेली ६०,०००/- रु. किंमतीची अपे रिक्षा एम.एच.४३ एफ.७६३५ व त्यांचे कब्जातुन चोरीस गेलेली (१) १२,०००/- रु. किंमतीची हिरो कंपनीची स्प्रीन्ट नावची काळ्या रंगाची गेअरची सायकल तसेच सातारा शहर परिसर, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातुन २,२०,०००/- रु. किंमतीच्या १९ वेगवेगळ्या वर्णनाच्या सायकली असे एकुण २.९२,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. अशा प्रकारे बोरगाव पोलीस ठाणेंकडील डी. बी. पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराना जेरबंद केले. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीना अटक करुन मा. कोर्टास भेटविले असता १ दिवसाची पोलीस कोठडी रिंमाड मंजुर करणेत आली आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक, सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र तेलतुंबडे, सहा. पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ. हणमंत सावंत, पो.ना. दादा स्वामी. अमोल सपकाळ, प्रशांत चव्हाण, सुनिल कर्णे, अमोल गवळी पो.कॉ केतन जाधव, विशाल जाधव यांनी केली आहे.

आरोपीचे नाव

(१) प्रकाश धनाजी जाधव वय ५० वर्षे रा. अपशिंगे (मि.) ता. जि. सातारा (२) नासिर खालिद खान वय ३८ वर्षे रा. वर्णे ता. जि. सातारा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट